‘भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांना वातावरणाच्या स्थितीचा अंदाज यावा, म्हणून त्यांना दाखवण्यासाठी धोनीने सामना संपल्यानंतर पंचाकडून चेंडू घेतला,’ अशी माहिती देत शास्त्रींनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
‘धोनी निवृत्त होत असल्याच्या चर्चा केवळ मूर्खपणाच्या आहेत,’ असं म्हणत रवी शास्त्रींनी धोनीच्या टीकाकारांना फटकारलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील संथ फलंदाजीमुळे महेद्रसिंह धोनीला सोशल मीडियावर टार्गेट करण्यात येत होतं. धोनीने सर्व फॉरमॅटमधून आता निवृत्त व्हावं, असंही मत काहींनी व्यक्त केलं.
अशातच धोनीने सामना संपल्यानंतर पंचाकडून चेंडू घेतल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना अधिकच वेग आला.
दरम्यान, धोनीने 2014 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
संबंधिता बातम्या :
इंग्लंड दौऱ्यानंतर धोनीचे निवृत्तीचे संकेत