एक्स्प्लोर
शाहिद आफ्रिदीकडून भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं देखील भारताला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : देशभरात आज 70व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटर्सनंही देशवासियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पण याचबरोबर पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं देखील भारताला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देण्यासाठी आफ्रिदीनं एक खास ट्वीट केलं आहे.
या ट्वीटमध्ये त्यानं म्हटलं आहे की, 'भारताला स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा! शेजारी तर शेजारीच असतात ना, तर चला आपण शांतता, सहिष्णुता आणि प्रेम यासाठी काम करुयात आणि मानवतेला आणखी मजबूत करु.'
भारत आणि पाकिस्तानच्या मैत्रीबाबत याआधीही आफ्रिदीनं आपलं मत बऱ्याचदा व्यक्त केलं आहे. त्यानं आधीही सांगितलं आहे की, युवराज आणि धोनीसारख्या भारतीय दिग्गज क्रिकेटर्ससोबत आपले चांगले संबंध आहेत. दरम्यान, नुकतंच कर्णधार विराट कोहलीनं शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला आपली बॅट देऊ केली होती.Happy Independence Day India! No way to change neighbours, let's work towards peace, tolerance and love. Let humanity prevail.# HopeNotOut
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) August 14, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement