Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty : भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रेंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांनी बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये (Badminton Asia Championship 2023) सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सात्विक आणि चिराग यांनी तब्बल 58 वर्षांनंतर भारताला बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.
सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी
बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेतील पुरुष दुहेरीसाठी अंतिम सामना रविवारी पार पडला. अंतिम फेरीत सात्विक (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग (Chirag Shetty) जोडीनं मलेशियाच्या आंग ये (Ong Yew Sin) आणि सिन-तोई यी (Teo Eo Yi) या जोडीचा पराभव केला. सात्विक आणि चिराग यांनी 16-21, 21-17, 21-19 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक आणि चिरागनं पुनरागमन करत सलग गेममध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये 58 वर्षांनंतर भारताला सुवर्ण
1971 मध्ये, दिपू घोष-रमन घोष या भारतीय जोडीने शेवटचं आशियाई चॅम्पियनशिप दुहेरीत कांस्यपदक जिंकलं होतं. या खेळीनंतर भारतीय जोडीने दुहेरीत पुन्हा पदक जिंकलं होतं. त्यानंतर आता तब्बल 58 वर्षानंतर सात्विक आणि चिरागने ही शानदार ऐतिहासिक कामगिरी करत भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात्विक आणि चिरागचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ''सात्विक आणि चिराग आम्हाला तुमचा अभिमान आहे. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनून इतिहास रचल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.''
दरम्यान, भारतीय बॅडमिंटन संघाने सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना 20 लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :