Sania Mirza announces retirement: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी गेलेल्या सानियाने यंदाचं म्हणजेच 2022 हा तिचा शेवटचा सीजन असेल असं म्हटलं आहे.
सानियाने दिलेल्या माहितीनुसार यंदाचं वर्ष तिचा शेवटचा सीजन असल्यामुळे ती यंदा अखेरदा टेनिस कोर्टावर खेळताना दिसणार आहे. सानियाने बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन, 2022 मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या डावात पराभवानंतर निवृत्तीची घोषणा केली. सानिया मिर्झा म्हणाली, ''मी ठरवलं आहे की हा माझा शेवटचा सीजन असणार आहे. मी या सीजनमध्येही पूर्णपणे खेळू शकेन का? हे ही मला माहित नाही. स्लोवेनियाच्या काजा जुवान आणि तमारा जिदानसेकयांनी पहिल्या फेरीत डैवैत सानिया आणि किचेनोक यांना 6-4 आणि 7-6 अशा दोन सेट्समध्ये मात दिली.
सामन्यानंतर सानिया काय म्हणाली?
ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सामना पराभूत झाल्यानंतर सानिया म्हणाली, 'निवृत्ती घेण्याची काही कारणं आहेत. मला वाटतं मला सामन्यासाठी पूर्ण फिट होण्यासाठी मला अधिक वेळ लागत आहे. मी इतका प्रवास करुन माझ्या 3 वर्षाच्या मुलाची प्रकृतीही धोक्यात टाकत आहे. मला वाटतं माझी प्रकृती नीट साथ देत नसून गुडघेही फार दुखतात. त्यामुळेच मला सामन्यासाठी फिट होण्यास जास्त वेळ लागत आहे.'
सानियाची कामगिरी थोडक्यात
सानिया मिर्झा हिने महिला डबल्समध्ये 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बलडन आणि यूएस ओपन या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसंच मिक्स्ड डबल्समध्ये तिने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये यूएस ओपन या स्पर्धा जिंकल्या आहे.
हे ही वाचा :
- विराटच्या कसोटी कर्णधार पदाच्या राजीनाम्यानंतर रोहितची सोशल मीडिया पोस्टही व्हायरल, म्हणतो 'हे तर धक्कादायक!'
- Virat Kohli : विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले
- विराट कोहलीच्या राजीनामापत्रात केवळ दोन नावं, कर्णधारपद सोडताना कोहली नेमकं काय म्हणाला?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha