Virat Kohli Steps Down as Test Captain : टी 20 आणि एकदिवसीय कर्णधारपदानंतर विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे.  दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने आपला निर्णय जाहीर केला. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही महत्वाची माहिती दिली आहे.  आपल्या पोस्टमध्ये विराट कोहलीने रवी शास्त्री आणि धोनी यांचे आभार व्यक्त केले आहेत. विराटच्या पत्रात धोनी आणि रवी शास्त्री यांच्या नावाचा उल्लेख आहे. तसेच बीसीसीआय आणि चाहत्यांचेही विराट कोहलीने आभार व्यक्त केले आहेत. 


विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडत असल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक पत्र पोस्ट केले आहे. यामध्ये विराट कोहलीने बीसीसीआय आणि चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. 


विराट कोहलीने आपल्या ट्वीटमध्ये काय म्हटलेय -
सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडलेली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच योग्य वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही, किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा 120 टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता. 


मला इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल बीसीसीआयचे आभार व्यक्त करतो. तसेच पहिल्या दिवसापासून मला साथ देणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तुमच्यामुळे माझं करियर संस्मरणीय आणि सुंदर झाल. रवी भाई (रवी शास्त्री) आणि सपोर्ट स्टाफ यांचेही आभार, यांच्यामुळे भारतीय संघाची कामगिरी उंचावली. भारतीय संघाच्या यशात यांचाही मोलाचा वाटा आहे. सर्वात अखेरीस एम.एस. धोनीचेही आभार.. त्याने कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला अन् त्याला माझ्यात भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाणारा खेळाडू दिसला.






विराटची कामगिरी - 
विराट कोहलीने भारतीय संघाचे 68 कसोटी सामन्यात नेतृत्व केलं आहे. यादरम्यान भारतीय संघाला 40 सामन्यात विजय मिळाला आहे. तर  17 सामन्यात पराभव झाला आहे.  विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी  99 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 7962 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये कोहलीच्या नावावर  27 शतक आणि 28 अर्धशतक आहेत.  


संबधित बातम्या :
Virat Kohli : विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले
Captaincy Record: विराट तिसऱ्या स्थानी, जगातील अव्वल दहा कसोटी कर्णधार, पाहा यादी
पुजारा-रहाणेची कसोटी कारकीर्द संपली? पाहा काय म्हणाला विराट कोहली
BLOG : आत्मपरीक्षणाची वेळ!