Satara Nagarpanchayat Result: सातारा जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरशी केली आहे. परंतु, शशिकांत शिंदे यांना कोरेगावात झटका बसला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 52 उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, शशिकांत शिंदे यांच्या कोरेगावात राष्ट्रवादीला फक्त चारच जागांवर विजय मिळवता आला आहे. कोरेगावात राष्ट्रवादीच्या चार उमेदवारांचा विजय झाला आहे तर शिवसेनेने 13 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आमदार महेश शिंदे यांचा पॅनल कोरेगावात विजयी झाला आहे. 


पाटण तालुक्यात राष्ट्रवादीच्या 15 उमेदवारांचा विजय झाल्याने राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर शिवसेनेला केवळ दोनच जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सत्यजित पाटकर यांची सरशी झाली तर गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना झटका बसला आहे. 


दहीवडीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. येथे राष्ट्रवादीला आठ, भाजपला 5, शिवसेना 3 तर एका जागेवर 
अपक्ष उमेदवाराचा विजय  झाला आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे विरुद्ध त्यांचे शिवसेनेत असलेले बंधू शेखर गोरे आणि प्रभाकर देशमुख यांच्यात लढत झाली. कोणालाच बहुमत नसल्याने शिवसेना राष्ट्रवादीला पाठींबा देणार की, भाजपला यासह अपक्ष उमेदवार कोणत्या बाजुला जाणार यावर दहिवडीत कोणाची सत्ता येणार हे ठरणार आहे.


लोणंद तालुक्यात राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. येथे राष्ट्रवादी 10, काँग्रेस 3, भाजप 3 आणि अपक्षाचा एका जागेवर विजय झाला आहे. दहिवडीत आमदार मकरंद पाटील यांनी भाजप आणि स्थानिक आघाडीवर मात करत सत्ता खेचून आणली आहे. 


खंडाळा तालुक्यातही राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. खंडाळ्यात राष्ट्रवादी 10 तर भाजपच्या 7 उमेदवारांचा विजय झाला आहे.  वडूजमध्येही कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही नाही. येथे राष्ट्रवादी 5, भाजप 6, काँग्रेस 1, अपक्ष 4 आणि वंचितला एक जागा मिळाली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Karjat Nagarpanchayat Election Result : कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी 


Kavathe mahankal result : निवडणुकीपूर्वी म्हणाले, माझा बाप नक्की आठवेल, आता रोहित पाटील म्हणतात, आबा मिस यू!