Virat Kohli steps down as India Test captain : टी20, एकदिवसीय कर्णधारपदानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदालाही रामराम ठोकला आहे. शनिवारी विराट कोहलीने सोशल मीडियावरुन कसोटी कर्णधारपद सोडल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामधील वाद सुरु होता. टी20 कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय असा वाद सुरु झाला होता.  विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 58.82 टक्के सामने जिंकले आहेत. विराटच्या नेतृत्वावात 68 पैकी 40 सामने जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केलाय. विराट भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार आहे.


नुकत्यात दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-1 च्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागले होतं. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीकडे धुरा सोपवण्यात आली होती. विराट कोहलीने भारतीय संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने विदेशात विजय मिळवले आहेत. विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक विजय संपादन केले आहेत.  





विराट कोहलीने आपल्या ट्वीटमध्ये काय म्हटलेय -
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडत असल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक पत्र पोस्ट केले आहे. यामध्ये विराट कोहलीने बीसीसीआय आणि चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्यासोबत आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे.  विराट कोहली म्हणतो,  ' मागील सात वर्षांपासून भारतीय संघाला योग्य दिक्षेला घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझी जबाबदारी इमानदारीने पूर्ण केली आहे.'' मला इतक्या मोठ्य कालावधीपर्यंत संधी दिली, त्याबद्दल बीसीसीआयचे आभार व्यक्त करतो, असेही कोहलीने म्हटलेय.  









विराट कोहलीने भारतीय संघाचे 68 कसोटी सामन्यात नेतृत्व केलं आहे. यादरम्यान भारतीय संघाला 40 सामन्यात विजय मिळाला आहे. तर  17 सामन्यात पराभव झाला आहे.  विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी  99 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 7962 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये कोहलीच्या नावावर  27 शतक आणि 28 अर्धशतक आहेत.  






संबधित बातम्या :
Captaincy Record: विराट तिसऱ्या स्थानी, जगातील अव्वल दहा कसोटी कर्णधार, पाहा यादी
पुजारा-रहाणेची कसोटी कारकीर्द संपली? पाहा काय म्हणाला विराट कोहली
BLOG : आत्मपरीक्षणाची वेळ!


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live