हैदराबाद : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाचं डोहाळजेवण नुकतंच पार पडलं. सानियाच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सानिया सध्या आपल्या माहेरी म्हणजे हैदराबादला आली असून पती शोएब मलिकही मिर्झा कुटुंबासोबत राहत आहे.
बाळाचं आडनाव मिर्झा मलिक असेल, असंही दोघांनी जाहीर केलं आहे. त्यानुसार केकवर बेबी मिर्झा मलिक असं लिहिलं आहे.
सहावेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी 2010 मध्ये निकाह केला होता. एप्रिल महिन्यात इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन सानियाने प्रेग्नन्सीविषयी माहिती दिली होती.
सानिया आणि शोएब यांनी आपल्याला मुलगी हवी असल्याची इच्छा काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीचं वृत्त बाहेर आलं. आता मात्र सानिया मुलगा-मुलगी कोणीही असो, आपल्याला मातृत्वाची आस लागल्याचं सांगते.
प्रेग्नन्सीच्या काळात रात्रभर जागरणं होत असल्याचं सानिया सांगते. बाळाच्या जन्मानंतर त्याची डायपर बदलण्यात पुन्हा रात्री जागावं लागेल, असंही तिला वाटतं.
टेनिसपासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कालावधीसाठी दूर राहावं लागत असल्यामुळे कधी कधी खेळाची आठवण येते, मात्र आयुष्यात बदल स्वीकारावे लागतात, असंही सानिया आवर्जून सांगते.
आणखी फोटो पाहण्यासाठी क्लिक करा