एक्स्प्लोर

एकाच दिवशी दोन हॅटट्रिक्स, बद्री आणि टायला लागोपाठ तीन विकेट्स

राजकोट : बंगळुरुचा लेग स्पिनर सॅम्युअल बद्री आणि गुजरातचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय या दोघांनीही आयपीएलच्या रणांगणात एकाच दिवशी हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम गाजवला. बद्रीने मुंबईच्या डावातल्या तिसऱ्याच षटकात पार्थिव पटेल, मिचेल मॅकलेनहान आणि रोहित शर्मा यांना लागोपाठच्या तीन चेंडूंवर माघारी धाडण्याची कामगिरी बजावली. मुंबईच्या डावात त्याच्या गोलंदाजीचं पृथःकरण होतं चार षटकं, एक निर्धाव नऊ धावा आणि चार विकेट्स. आयपीएलमध्ये हॅटट्रिक साजरी करणारा बद्री हा आजवरचा बारावा, तर अँड्र्यू टाय हा तेरावा गोलंदाज ठरला. गुजरातच्या अँड्र्यू टायने अखेरच्या षटकात पुण्याच्या अंकित शर्मा, मनोज तिवारी आणि शार्दूल ठाकूर यांना लागोपाठच्या तीन चेंडूंवर बाद केलं. पण विशेष म्हणजे अँड्र्यू टायने हॅटट्रिकसह पाच विकेट्स घेण्याचाही पराक्रम गाजवला. पुण्याच्या डावात त्याचं पृथक्करण चार षटकं, 17 धावा आणि पाच विकेट्स असं होतं. मुंबई आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. बंगळुरुने  मुंबईला विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईची तिसऱ्याच षटकात चार बाद 7 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कायरन पोलार्ड आणि कृणल पांड्या यांनी मुंबईची पडझड होऊ दिली नाही. कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्यानं सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 93 धावांच्या भागिदारीनं मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर सात चेंडू आणि चार विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या

10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?
10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?
AUS vs BAN 2nd Test : W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
WTC Points Table : पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Embed widget