एक्स्प्लोर

सचिन तेंडुलकरचा एक विक्रम विराट कोहली मोडू शकणार नाही : सेहवाग

विराट कोहली या पीढीचा सर्वोत्तम फलंदाज आहे. पण तो सचिन तेंडुलकरचा एक विक्रम वगळता बहुतांश सगळे विक्रम मोडू शकतो, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा फलंदाजी करतो, तेव्हा त्याला रोखणं सोपं नसतं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणेच कोहलीनेही अनेक विक्रम आपल्या नवावावर केले आहेत. दमदार फलंदाजी आणि धावांच्या भुकेमुळे कोहली तेंडुलकरचे काही विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. मात्र विराट कोहलीला सचिनचा एक विक्रम मोडता येणार नाही, असं टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचं म्हणणं आहे. विराट कोहली या पीढीचा सर्वोत्तम फलंदाज आहे. पण तो सचिन तेंडुलकरचा एक विक्रम वगळता बहुतांश सगळे विक्रम मोडू शकतो, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला. "सध्याच्या घडीला कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि ज्या हिशेबाने तो धावा करत आहे, त्याची बरोबरी कोणीच करु शकत नाही. मला विश्वास आहे की, तो सचिन तेंडुलकरच बहुतांश विक्रम आपल्या नावावर करेल. मात्र सचिनचा असा एक विक्रम आहे, जो कोणीही मोडू शकत नाही. हा विक्रम आहे 200 कसोटी सामने खेळण्याचा. मला वाटत नाही की कोणीही कसोटी क्रिकेटमध्ये एवढे सामने खेळू शकतो. सचिनच्या विक्रमापासून कोहली किती दूर? विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग दोन शतकं केली. आता त्याच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 43 शतकं जमा आहेत. तो सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमापासून फार दूर नाही. सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये 44.83 च्या सरासरीने 18,426 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने 230 वनडे डावात 60.31 च्या सरासरीने 11,520 धावा बनवल्या आहेत. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर इथे कोहली सचिनच्या विक्रमाच्या अर्ध्यापर्यंत पोहोचला आहे. विराट कोहलीने 77 कसोटी सामन्यांच्या 131 डावांमध्ये 25 शतकं केली आहे. तर सचिनने 329 डावांमध्ये 51 शतक लगावली आहेत. मात्र सचिनचा 200 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम कोहलीसह कोणताही खेळाडू मोडू शकत नाही, असं सेहवागला वाटतं.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Karn Sharma Announces Retirement : 551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
IND vs SL 2nd TEST Day-1 LIVE : गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
Suryakumar Yadav : हसलो होतो, जेव्हा...; ज्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याच्यावर अशी वेळ! कर्णधारपद गेलं, संघातूनही हकालपट्टी; सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं
हसलो होतो, जेव्हा...; ज्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याच्यावर अशी वेळ! कर्णधारपद गेलं, संघातूनही हकालपट्टी; सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget