मुंबई : महिला विश्वचषकातील 12 वर्षांपूर्वीचा पराभव विसरुन भारतीय महिला संघ विश्वविजेता होण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानात उतरणार आहे. कर्णधार मिताली राजच्या टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध मुकाबला होईल.


फायनलपूर्वी मिताली राजच्या टीम इंडियाला देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. क्रिकेटचे दोन दिग्गज सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही भारतीय महिला संघाला मनोबल वाढवण्याऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सेहवागचा शुभेच्छा संदेश

‘’आपल्या पोरींनी ते करुन दाखवलंय, जे पोरांनाही जमलं नाही. 15 वर्ल्ड कपचे फायनल खेळलेल्या ऑस्ट्रेलियाला बाहेर केलं आहे. आता फायनलमध्येही पोरी अशाच खेळतील अशी अपेक्षा आहे. त्यांना शुभेच्छा’’, असा शुभेच्छा संदेश वीरेंद्र सेहवागने दिला आहे.

https://twitter.com/virendersehwag/status/888709073188691968

सचिनचा शुभेच्छा संदेश

दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही एका खास व्हिडिओद्वारे भारतीय महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/sachin_rt/status/889021083332038656