एक्स्प्लोर

फिफा विश्वचषकात ‘रशियन क्रांती’?

रशियाची फिफा विश्वचषकात खेळण्याची ही अकरावी वेळ आहे. पण आजवरच्या इतिहासात रशियाला विजेतेपद पटकावायचं दूर, पण अंतिम फेरीही गाठता आलेली नव्हती.

यंदाच्या फिफा विश्वचषकात रशियन क्रांती पाहायला मिळणार का, असा प्रश्न फुटबॉलच्या जाणकारांना पडला आहे. आणि त्याचं कारण आहे रशियानं पहिल्या दोन सामन्यांमध्ये मिळवलेला धमाकेदार विजय. रशियानं या दोन विजयांसह बाद फेरीचं तिकीटही कन्फर्म केलं. त्यामुळं मायदेशातल्या विश्वचषकात रशिया आणखी कुठवर मजल मारणार याविषयी फुटबॉलरसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

रशियाकडून इजिप्तचा 3-1 असा पराभव. त्याआधी, रशियानं उडवला सौदी अरेबियाचा 5-0 असा धुव्वा.

ही आहे यजमान रशियाची फिफा विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमधली कामगिरी. या कामगिरीसह रशियानं विश्वचषकाच्या बाद फेरीचं तिकीटही बुक केलं आहे. यंदाच्या फिफा विश्वचषकात रशियन क्रांती पाहायला मिळणार का, असा प्रश्न फुटबॉलच्या जाणकारांना पडला आहे.

रशियाच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात खरोखरच मोठ्या झोकात झाली, पण विश्वचषकाआधी ही परिस्थिती नव्हती. विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित सात सामन्यांमध्ये रशियाला एकही विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळं रशियाच्या पाठीराख्यांमध्ये आपल्या संघाच्या कामगिरीविषयी फारसा उत्साह नव्हता. पण रशियन संघानं लागोपाठ दोन विजय मिळवून, १९८६ सालानंतर पहिल्यांदाच विश्वचषकाची बाद फेरी गाठली आणि त्यांच्या देशातलं सारं चित्रच पालटलं.

फिफा विश्वचषकात ‘रशियन क्रांती’?

रशियातला फिफा विश्वचषकासाठीचा उत्साह कितीतरी पटीनं उंचावला आहे. यजमानांची पहिल्या दोन सामन्यांधली कामगिरी हेच त्याचं कारण आहे.

रशियाची फिफा विश्वचषकात खेळण्याची ही अकरावी वेळ आहे. पण आजवरच्या इतिहासात रशियाला विजेतेपद पटकावायचं दूर, पण अंतिम फेरीही गाठता आलेली नव्हती. 1966 सालच्या विश्वचषकात रशियानं उपांत्य फेरीत धडक मारली होती. तीच रशियाची विश्वचषकातली आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदाच्या विश्वचषकात पहिल्या दोन्ही सामन्यात जबरदस्त कामगिरी बजावून, रशियानं तो इतिहास बदलण्याचा जणू चंग बांधला आहे.

रशियाचा २०१८ सालच्या विश्वचषकाचा संघ हा आजवरचा त्यांचा सर्वोत्तम संघ समजला जातोय. डेनिस चेरिशेव्ह, युरी गझिन्स्की, अलेक्झांडर गोलोविन, आर्टेम झ्युबा या शिलेदारांची आतापर्यंतची कामगिरी प्रभावी ठरली आहे.  27 वर्षांच्या डेनिस चेरिशेव्हनं दोन सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक तीन गोल झळकावले आहेत. आर्टेम झ्युबानंही दोन्ही सामन्यांमध्ये प्रत्येकी एक गोल नोंदवून, लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. त्याशिवाय युरी गझिन्स्की आणि अलेक्झांडर गोलविनच्या खात्यातही एकेका गोलची नोंद झाली आहे. पण ही रशियाची सर्वोत्तम कामगिरी नाही, तर रशियाची सर्वोत्तम कामगिरी आपल्याला अजून पाहायला मिळायची असल्याचा दावा प्रशिक्षक स्टॅनिस्लाव चेर्चेसोव्ह यांनी केला आहे.

फिफा विश्वचषकात ‘रशियन क्रांती’?

व्लादिमीर पुतिन यांच्या रशियात यंदा पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं मायदेशातल्या विश्वचषकात रशिया आणखी किती सर्वोत्तम कामगिरी बजावतो, याविषयी जाणकारांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. पण यजमानांचं म्हणाल, तर फुटबॉलच्या इतिहासात यजमानांनी आजवर सहावेळा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यात 1930 साली उरुग्वे, 1934 साली इटली, 1966 साली इंग्लंड,  1974 साली जर्मनी, तर 1978 साली अर्जेंटिनानं यजमान असताना फिफा विश्वचषक  जिंकण्याचा मान मिळवला होता. यंदा रशियाचा संघ त्यांच्या पंक्तीत बसतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget