Russia Ukraine Conflict: युक्रेनवर रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफानं (FIFA) मोठी घोषणा केलीय. फिफा आणि यूईएफनं सोमवारी रशियाला पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निलंबित केलंय. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतही रशियावर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर युरोपियन फुटबॉलच्या प्रशासकीय समितीने रशियन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज गॅझप्रॉमसोबतची भागीदारीही संपवलीय. दरम्यान, फिफा आणि यूईएफच्या या निर्णयामुळं रशियाला मोठा धक्का बसलाय.
रशियाच्या क्लबवरही घातली बंदी
रशियाच्या राष्ट्रीय संघावरच नव्हे तर त्याच्या क्लब संघांवरही ही बंदी घालण्यात आलीय. या बंदीनंतर आता रशियाचा कोणताही क्लब संघ यईएफएच्या कोणत्याही स्पर्धेत खेळू शकणार नाही. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.
24 मार्चला विश्वचषकाचा क्वॉलिफाइंग प्ले- ऑफ सेमीफायनल सामना खेळला जाणार होता
रशियाचा फुटबॉल संघ येत्या 24 मार्चला पोलंडविरुद्ध क्वॉलिफाइंग प्ले-ऑफ सेमीफायनलचा सामना खेळणार होता. याशिवाय, त्याचा पुढचा सामना स्वीडन किंवा झेक रिपब्लिकशी 29 मार्चला खेळला जाणार होता. परंतु, रशियावर घालण्यात आलेल्या बंदीनंतर दोन्ही सामने रद्द होतील.
फिफानं आणि यूईएफएचा निर्णय भेदभावपूर्ण
रशियन फुटबॉल फेडरेशनने या निलंबनाच्या कारवाईचा निषेध केलाय. फिफानं आणि यूईएफएनं घेतलेला निर्णय भेदभावपूर्ण आहे. या बंदीच्या निर्णयामुळं मोठ्या संख्येनं खेळाडू, प्रशिक्षक, क्लब आणि राष्ट्रीय संघांच्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होईल, असंही त्यांनी म्हटलंय.
हे देखील वाचा-
- IPL 2022: सुरेश रैना गुजरात टाइटन्सकडून खेळणार? जेसन रॉयनं माघार घेतल्यानंतर चर्चांना उधाण
- Smriti Mandhana: स्मृती मांधना विश्वचषक खेळणार की नाही? दुखापतीबाबत महत्वाची माहिती समोर
- भारताचा माजी क्रिकेटर किडनीच्या आजारानं त्रस्त, मोहम्मद अजहरुद्दीनकडून सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha