IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघाला लीग सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का लागलाय. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयनं (Jason Roy) आयपीएल 2022 मधून माघार घेतलीय. बराच काळ बायो बबलमध्ये राहिल्यानं आलेल्या थकव्यामुळं त्यानं हा निर्णय घेतलाय. मात्र, त्यानंतर गुजरातच्या संघात सुरेश रैनाची (Suresh Raina) ऐन्ट्री होणार का? अशा चर्चांना उधाण आलंय. 


दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर स्पॉट फिक्सिंगसाठी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी सुरेश रैना दोन वर्ष गुजरात लायन्स खेळताना दिसला होता. रैनानं गुजरात लायन्सचं नेतृत्व केले होते. चेन्नईच्या संघानं यंदा रैनाला रिटेन केलं नाही. तसेच आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही फ्रँचायझीनं त्याला विकत घेतलं नाही. ज्यामुळं चाहत्यांकडून चेन्नईच्या संघावर टीका केली जात आहे. 


यातच जेसन रॉयनं आयपीएलमधून माघार घेतल्याची बातमी आली. त्यानंतर चाहत्यांनी ट्विटरवरच्या माध्यमातून फ्रँचायझीनं रैनाचा संघात समावेश करावा, अशी विनंती करत आहेत. जेसन रॉयच्या एवजी कोणत्या खेळाडूला खेळवायचं? याबाबत गुजरात टायटन्सनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार असेल. या संघात राशिद खान, मोहम्मद शमी, शुभमन गिल या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha