एक्स्प्लोर

विराटच आरसीबीचा कर्णधार, संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट

रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूचं कर्णधारपद विराट कोहलीकडून एबी डिव्हिलिअर्सकडे देण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र टीम मॅनेजमेंटने या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुंबई : रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूचं कर्णधारपद विराट कोहलीकडून एबी डिव्हिलिअर्सकडे सोपण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. आयपीएलच्या 12व्या सीजनच्या एबी डिव्हिलिअर्स आरसीबीचा कर्णधार असेल असं बोललं जात होतं, मात्र आरसीबी टीम मॅनेजमेंटने या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूच्या प्रवक्त्यांनी याबाबत म्हटलं की, टीमच्या कर्णधार पदाबाबतच्या बातम्या अफवा आहेत. 12व्या सीजनमध्येही आरसीबीचं कर्णधारपद विराट कोहलीकडेच राहणार आहे.

दक्षिण आफ्रिकेलचा फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा एबी डिव्हिलिअर्सच्या खांद्यावर सोपवली जाणार असल्याची अफवा काही दिवसांपासून सुरू होती.

विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीलपासून म्हणजे 2008पासून आरसीबीकडून खेळत आहे. याशिवाय गेल्या सहा सीजनपासून विराट आरसीबीचं नेतृत्व करत आहे. मात्र विराटच्या नेतृत्वात संघाला अद्याप आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरता आलेलं नाही. त्यामुळे कर्णधार बदलाच्या अफवा काही दिवसांपासून पसरत होत्या.

विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. सुरेश रैनानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराटने आयपीएलमध्ये 163 सामन्यात 4948 धावा केल्या आहेत.

आरसीबीने आपल्या कोचिंग स्टाफमध्येही बदल केले आहेत. कोच डेनिअल विटोरीच्या जागी गॅरी कर्स्टनला मुख्य कोच म्हणून नियुक्त केलं आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या कर्णधार पदावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र विराटच आरसीबीचा कर्णधार राहणार हे टीम मॅनेजमेंटने स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar On Smriti Mandhana: स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
Embed widget