IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात झाली. आयपीएलचे आतापर्यंत 11 सामने खेळण्यात आले आहेत. आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला रंग चढत असल्याचं दिसत असताना क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का देणारी माहिती समोर आलीय. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज रॉस टेलरनं आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती घेतली आहे. रॉस टेलरनं सोमवारी नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून शेवटचा सामना खेळला.
रॉस टेलरनं 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट केला. नेदरलँड्सविरुद्धच्या तिसरा एकदिवसीय सामना त्याचा 450 वा आणि शेवटचा सामना ठरला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं शेवटचा कसोटी सामना खेळला होता. परंतु, त्याला त्याच्या घरच्या मैदानावर, सेडन पार्कवर शेवटचा सामना खेळून क्रिकेटला अलविदा करायचं होतं.
रॉस टेलरचं 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
रॉस टेलरनं 2006 मध्ये न्यूझीलंडकडून पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर काही महिन्यांनी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण करण्याची संधी मिळाली. टेलरनं 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8,593 धावा आणि 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1,909 धावा केल्या आहेत. त्यानं आतापर्यंत 112 कसोटी सामने खेळले. ज्यात त्यानं 7,683 धावा केल्या आहेत. ज्यात 19 शतकाचा समावेश आहे.
शेवटच्या सामन्यात रॉस टेलर 14 धावांवर बाद
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा टेलर हा जगातील एकमेव खेळाडू आहे. शेवटच्या सामन्यात त्याला क्रीजवर येण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. मार्टिन गप्टिल आणि विल यंग यांच्या दुसऱ्या विकेटसाठी 203 धावांच्या भागीदारीमुळं त्याला 39व्या षटकात क्रीझवर यावं लागलं. तो मैदानातच येताच उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केलं. 14 धावांवर बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं.
हे देखील वाचा-
- Who is Vaibhav Arora: कोण आहे वैभव अरोरा? त्याच्यासमोर चेन्नईच्या फलंदाजांनी टेकले गुडघे
- IPL 2022 : चेन्नईचा कोच माइक हसीचं मोईन अलीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला...
- Ravindra Jadeja: चेन्नईच्या पराभवानंतर कर्णधार रवींद्र जाडेजा झाला भावूक, म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha