Mike Hussey On Moeen Ali : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाजीसाठी नेमण्यात आलेला कोच माइकल हसीने टीमचा स्टार ऑलराऊंडर मोईन अलीच्या फलंदाजीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. तो त्याच्या फलंदाजीने प्रभावित झाला असून मागील वर्षी त्याने सीएसकेकडून केलेल्या कामगिरीनंतर त्याचा खेळ आणखी निदर्शनास आल्याचं हसी म्हणाला. 


माइक हसीने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना मोईन अलीच्या फलंदाजीबाबत म्हणाला, 'खरं सांगायचं झालं तर मोईन अली एक अविश्वसनीय खेळाडू आहे. मी त्याला सर्वात बारकाईनं तेव्हा पाहिलं, जेव्हा मागील वर्षी तो चेन्नईकडून खेळत होता. मला त्याआधी माहित नव्हता कि तो इतका चांगला फलंदाज आहे. त्याच टायमिंग अगदी उत्तम आहे.'


आयपीएल 2021 मध्ये असं होतं मोईन अलीचं प्रदर्शन


चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना मोईन अलीने आयपीएल 2021 मध्ये अगदी शानदार प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे यंदा लिलावापूर्वी संघाने त्याला पुन्हा एकदा रिटेन करत संघात कायम ठेवलं. आयपीएल 2021 मध्ये 15 सामन्यात मोईन अलीने 137.30 च्या स्ट्राइक रेटने 357 रन केले होते. याशिवाय गोलंदाजीतही त्याने आपली छाप सोडत सहा विकेट्स पटकावले होते.  


चेन्नईचा तिसरा पराभव


मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 11व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 54 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग तिसरा पराभव ठरला. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 बाद 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जचा संघ 18 षटकांत सर्वबाद 126 धावांवर आटोपला. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्याचवेळी धोनीने देखील 23 धावा केल्या. पंजाबच्या या जबरदस्त विजयाचा हिरो होता लियाम लिव्हिंगस्टोन. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने आजच्या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने पहिल्या फलंदाजीत केवळ 32 चेंडूत 60 धावांची स्फोटक खेळी खेळली. यानंतर त्याने गोलंदाजीतही दोन विकेट्स घेतल्या.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha