WWE Wrestle Mania 2022 : डब्ल्यूडब्ल्यूई रेसल मेनिया (WWE Wrestle Mania) 38 च्या दुसऱ्या दिवसाचा सामना धमाकेदार झाला. रोमन रेन्स (Roman Reigns) आणि ब्रॉक लेसनर (Brock Lesnar) यांच्या युनिव्हर्सल आणि डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशिपसाठी (Undisputed Universal Champion) सामना झाला. रेसलमेनियामध्ये दोन्ही सुपरस्टार्सकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांनी चाहत्यांना कोणत्याही प्रकारे निराश केले नाही. Roman Reigns ने Brock Lesnar ला धूळ चारत 38 व्या WWE चॅम्पियन्सशिपवर नाव कोरलं आहे.


रोमन रेन्स आणि ब्रॉक लेसनर यांनी सामन्यात अनेक जबरदस्त चाली वापरल्या. मात्र शेवटी रोमनने लेसनरला मागे टाकले आणि विजय मिळवला. रोमन रेन्स आणि ब्रॉक लेसनर यांच्यात बराच काळापासून संघर्ष सुरु होता. त्यांच्यात अनेक सामने झाले आहेत. रोमन रेन्स आणि ब्रॉक लेसनर यांना रेसलमेनिया 38 मध्ये त्यांच्यातील स्पर्धा संपवण्याची चांगली संधी होती.






यामुळे त्यांच्यात Wrestle Mania सामना झाला आणि या रोमन रेन्स वरचढ ठरला. जर लेसनर जिंकला असता, तर रोमन युनिव्हर्सल चॅम्पियनशिपसाठी पुन्हा सामना झाला असता आणि त्यांची स्पर्धा कायम राहील असती. मात्र रोमन रेन्स जिंकल्यांने त्यांच्यातील स्पर्धा संपली असनू चॅम्पियनशिपवर रोमन रेन्सचं नाव कोरलं गेलं आहे.






 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha