IPL 2022 SRH vs LSG : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज सनराइजर्स हैदराबाद बनाम (SRH) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडिअममध्ये (D.Y. Patil Stadium) होणार आहे. आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.आयपीएलच्या यंदाच्या संगामात हैदराबाद आपला पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.


कॅप्टन केन विलियमच्या  (Kane Williamson) नेतृत्वाखालील हैदराबादला (SRH) त्यांच्या मोहिमेच्या सुरुवातीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून (RR) 61 धावांनी पराभव पत्करावा लागला. के.एल. राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखालील लखनौला (LSG) गुजरातकडून (GL) पराभवाचा सामना करावा लागला, तर चेन्नई सुपर किंग्जला (CSK) हरवून लखनौने पहिला विजय मिळवला. जेव्हा खेळाडूंच्या बाबत हैदराबाद सर्वात भाग्यवान संघांपैकी एक आहे कारण त्याच्याकडे सर्व चांगले खेळाडू आहेत.


जेसन होल्डर आणि काइल मेयर्स सारख्या काही कॅरेबियन खेळाडुंमुळे लखनौला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध प्रोत्साहन मिळेल. मार्कस स्टॉइनिस अजूनही उपलब्ध आहे कारण तो ऑस्ट्रेलियन संघासोबत पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. शेवटच्या सामन्यातील विजयामुळे लखनौचा उत्साह वाढला आहे आणि संघाला आपली विजयी मालिका कायम ठेवायची आहे. लखनौच्या संघात अनेक तगडे खेळाडू आहेत, जे सामना जिंकून देण्यात सक्षम आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha