एक्स्प्लोर

हिटमॅन रोहितच्या सिक्सरने 'ती' जखमी झाली, सामन्यानंतर रोहितनं 'हे' केलं अन् तिची कळी खुलली

भारताच्या सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. 92 चेंडूच्या आपल्या खेळीमध्ये रोहितने 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. या खेळीत रोहित शर्माने मारलेला एक षटकार प्रेक्षकांमध्ये असणाऱ्या मीनाला लागल्याने तिला दुखापत झाली.

बर्मिंगहॅम : टीम इंडियाच्या बांगलादेशवरच्या विजयाचा शिल्पकार रोहित शर्मानं त्या सामन्यानंतर एका भारतीय चाहतीची आवर्जून भेट घेतली. या तरुण चाहतीचं नाव मीना आहे. रोहितनं आपल्या शतकादरम्यान मारलेल्या एका षटकारानं मीनाला दुखापत झाली होती. त्यामुळं सामना संपल्यानंतर भारताच्या उपकर्णधारानं मीनाची भेट घेऊन तिची आस्थेनं चौकशी केली. रोहितनं मग तिला ऑटोग्राफ करून एक कॅपही भेट दिली. त्यामुळं मीनाची कळी भलतीच खुलली. विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताच्या सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. 92 चेंडूच्या आपल्या खेळीमध्ये रोहितने 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. या खेळीत रोहित शर्माने मारलेला एक षटकार प्रेक्षकांमध्ये असणाऱ्या मीनाला लागल्याने तिला दुखापत झाली. रोहित शर्माने सामन्यानंतर त्या तरूणीची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी रोहित शर्माने तिला एक खास भेट दिली. रोहित शर्माने मीनाला सही केलेली कॅप भेट दिली. रोहितच्या या अनोख्या भेटवस्तूमुळे मीनाचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. तिच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट दिसून येत होता. हिटमॅन रोहितच्या सिक्सरने 'ती' जखमी झाली, सामन्यानंतर रोहितनं 'हे' केलं अन् तिची कळी खुलली दरम्यान, भारत आणि बांगलादेश संघांमधल्या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मानं कालचा विजय 87 वर्षांच्या चारुलता पटेल यांच्या बरोबर साजरा केला आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनवर कालच्या सामन्यादरम्यान 87 वर्षांच्या चारुलता पटेल यांची उपस्थिती सर्वात लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मानं सामना संपल्यानंतर चारुलताबेन यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. चारुलताबेन यांनी विराट आणि रोहितला आजीच्या ममतेनं कुरवाळत दोघांचा लाडानं मुकाही घेतला. मग विराटनं चारुलता पटेल यांचा खास उल्लेख करुन, त्यांच्यासोबतचे आपले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.हिटमॅन रोहितच्या सिक्सरने 'ती' जखमी झाली, सामन्यानंतर रोहितनं 'हे' केलं अन् तिची कळी खुलली टीम इंडियाने  बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवत विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत शानदार एन्ट्री घेतली बुमराहने घेतलेल्या चार, तर हार्दिक पंड्याने घेतलेल्या तीन विकेट्सच्या बळावर भारताने बांगलादेशला रोखलं.  बर्मिंगहॅमच्या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी 315 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघाने 50 षटकांत नऊ बाद 314 धावांची मजल मारली होती. त्याला उत्तर देताना बांगलादेशचा डाव 48 व्या षटकातच सर्वबाद 286 धावांवर आटोपला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
Akeal Hosein on Cristiano Ronaldo : मला वाचवा... भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिज खेळाडूची इन्स्टाग्रामवर 60 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या सुपरस्टारकडे धाव, नेमकं काय घडलं?
मला वाचवा... भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिज खेळाडूची इन्स्टाग्रामवर 60 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या सुपरस्टारकडे धाव, नेमकं काय घडलं?
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Ind Playing 11 vs Nz Final : कुलदीप IN, वरुण OUT...; तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी हुकमी एक्का खेळणार, फायनलमध्ये अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
कुलदीप IN, वरुण OUT...; तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी हुकमी एक्का खेळणार, फायनलमध्ये अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
Embed widget