एक्स्प्लोर
रोहित शर्माची ‘सुपर हिट’, धोनीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
भारतीय संघात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदांच्या यादीच रोहित शर्माने धोनीच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. रोहितनं 77 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 62 धावांची खेळी करत आत्तापर्यंत 215 षटकार मारण्याचा विक्रम करत धोनीशी बरोबरी साधली आहे.
माऊंट मॉन्गॅनुई (न्यूझीलंड) : रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं रचलेल्या शतकी भागिदारीच्या जोरावर टीम इंडियानं तिसऱ्या वन डेत न्यूझीलंडवर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्माने या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
भारतीय संघात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदांच्या यादीच रोहित शर्माने धोनीच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. रोहितनं 77 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 62 धावांची खेळी करत आत्तापर्यंत 215 षटकार मारण्याचा विक्रम करत धोनीशी बरोबरी साधली आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसऱ्या वन डेत विजय मिळवत पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंडनं टीम इंडियाला विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र रोहित आणि विराटने तिसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला आकार दिला. मग अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकनं चौथ्या विकेटसाठी अभेद्य भागिदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारतातील सर्वाधिक षटकार मारणारे पाच अव्वल फलंदाज
- महेंद्रसिंह धोनी – 215
- रोहित शर्मा – 215
- सचिन तेंडुलकर – 195
- सौरव गांगुली – 189
- युवराज सिंह – 153
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement