एक्स्प्लोर

'हा' भारतीय फलंदाज ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडू शकतो : डेव्हिड वॉर्नर

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव तीन बाद 589 धावांवर घोषित केला. वॉर्नरने नाबाद 335 धावांची खेळी उभारली.

अॅडलेड : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांमध्ये अॅडलेड येथे डे-नाईट कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीत सलामीवीर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव तीन बाद 589 धावांवर घोषित केला. वॉर्नरने नाबाद 335 धावांची खेळी उभारली. त्याने 418 चेंडूंमधली ही खेळी 39 चौकार आणि एका षटकाराने सजवली. ऑस्ट्रेल्याने डाव घोषित केल्यानंतर सर्वत्र अशी चर्चा सुरु आहे की, त्यांनी (ऑस्ट्रेलियाने) इतक्या लवकर डाव घोषित करायला नको होता. वॉर्नरला अजून काही वेळ खेळण्याची संधी मिळाली असती तर त्याने कसोटी सामन्यात एका डावात सर्वाधिक 400 धावा करणाऱ्या ब्रायन लाराचा विक्रम मोडला असता. एका इंग्रजी क्रीडा वाहिनीने यासंदर्भात वॉर्नरकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की, डाव घोषित करणे हा संघाचा निर्णय होता आणि तोच निर्णय योग्य होता. वॉर्नर म्हणाला की, ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट मैदानांच्या सीमारेषा या दूर आहेत. या मैदानांवर दिवसभर खेळल्यानंतर खूप थकवा येतो. 200-300 धावांची खेळी केल्यानंतर मोठे फटके मारणं अवघड जातं. अशा परिस्थितीत फंलदाज बाद होण्याच्या शक्यता अधिक असतात. द्विशतक झाल्यानंतर मी मोठे फटके मारण्याऐवजी एक-दोन धावा काढण्यावरच अधिक भर देत होतो. दरम्यान, वॉर्नरला विचारण्यात आले की, ब्रायन लाराचा एका डावात 400 धावा फटकावण्याचा विक्रम कोण मोडू शकतो? त्यावर उत्तर देताना वॉर्नर म्हणाला की, भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा हा विक्रम मोडू शकतो. रोहित शर्मामध्ये ती क्षमता आहे, असे वॉर्नरला वाटते. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेन याने लवकर डाव घोषित केल्यामुळे त्याच्यावर सध्या टीका सुरु आहे. वॉर्नरला लाराचा रेकॉर्ड मोडण्यासाठी अवघ्या 66 धावांची आवश्यकता होती. ज्या स्ट्राईक रेटने आणि आक्रमकतेने वॉर्नर खेळत होता. ते पाहता अवघ्या 15-16 षटकांचा अधिक खेळ झाला असता तर वॉर्नरने लाराचा विक्रम मोडीत काढला असता, असा अंदाज अनेक क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget