Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत अनेकांना त्यांचा जीव देखील गमवावा लागला आहे. दरम्यान, युक्रेनमधील 30 लाख  नागरिकांनी देश सोडलाय. तर, 60 लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. या विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी ब्राझीलचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर पुढे आलाय. फेडरर फाऊंडेशननं या विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी 3.8 कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतलाय. रॉजर फेडररनं ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीय.


"युक्रेनमधील परिस्थिती पाहून मी आणि माझे कुटुंब खूप घाबरलो. निरपराध लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. हे हृदय हेलावणारे आहे. आम्ही येथे शांततेसाठी उभे आहोत. आम्ही युक्रेनमधील गरजू मुलांना आम्ही मदत करू. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं जवळपास 60 लाख विद्यार्थ्यी शाळेत जाऊ शकत नाही. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमधील मुलांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठी रॉजर फेडरर फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही युद्धग्रस्त मुलांना 3.8 कोटी रुपयांची मदत करणार आहोत, असं आश्वासन फेडरर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलंय. 


युक्रेन आणि रशियामधील संघर्ष अद्याप सुरुच आहे. आता युक्रेनच्या अधिकार्‍यांशी वाटाघाटी करणार्‍या रशियन शिष्टमंडळाच्या प्रमुखाने म्हटले आहे की, दोन्ही बाजू युक्रेनच्या तटस्थ स्थितीबाबतच्या कराराच्या जवळ पोहोचल्या आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. रशियन शिष्टमंडळाचे अध्यक्ष व्लादिमीर मेडिन्स्की यांनी शुक्रवारी सांगितले की, युक्रेनच्या नाटोमध्ये सामील होण्याच्या आणि तटस्थ भूमिका घेण्याच्या मुद्द्यांवरील दोन्ही बाजूचे मतभेद दूर होण्याच्या जवळ पोहोचले आहेत.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha