Glenn Maxwell marries Vini Raman: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल लग्न बंधनात अडकलाय. ग्लेन मॅक्सवेलनं भारतीय वंशाची त्याची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत लग्न केलंय. मॅक्सवेल आणि विनी यांचं लग्न 18 मार्च म्हणजेच होळीला एका खाजगी समारंभात झालाय. ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीय. 


इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली लग्नाची माहिती
ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण या दोघांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करीत लग्न केल्याची माहिती दिलीय. मॅक्सवेल आणि  विनी यांचा साखरपुडा 2020 मध्ये झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, कोव्हिड आणि लॉकडाऊनमुळं मॅक्सवेलचं लग्न रखडलं होतं. 


सार्वजनिक उद्यानात मॅक्सवेलनं विनीला केलं होतं प्रपोज
विनी आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात चांगली बॉन्डिंग आहे. मॅक्सवेलनं एकदा सांगितलं होतं की, विनीनेच त्याला मानसिक आरोग्याच्या समस्येवर मात करण्यास मदत केली. मानसिक आरोग्यामुळं मॅक्सवेलला मधल्या काळात क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा लागला. विनीनं एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. मॅक्सवेलनं तिला प्रपोज केलं होतं, असंही तिनं त्यावेळी सांगितलं होतं. मॅक्सवेलनं विनीला पोर्ट मेलबर्नजवळील एका सार्वजनिक उद्यानात प्रपोज केलं होतं. 


विनी रामन कोण आहे?
विनी रामन ही भारतीय वंशाची असली तरी तिचा जन्म 3 मार्च 1993 मध्ये ऑस्ट्रेलियातच झाला आहे. परंतु, विनीचे पालक भारतीय आहेत. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले आणि तिथेच स्थायिक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्सवेल आणि विनी रमन 2017 पासून एकमेकांना डेट करीत होते. 


भारताचा जावई बनणारा मॅक्सवेल दुसरा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू
मॅक्सवेलपूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन टेटनं 2014 मध्ये भारतीय मॉडेल माशूम सिंघासोबत लग्न केलं होतं. शॉन टेटनंतर मॅक्सवेल आता भारताचा जावई बनणारा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha