Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी दोन्ही संघातील चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं भारताचा दारूण पराभव केला होता. यातच आशियाई क्रिकेट परिषदनं आशिया चषक 2022 ची घोषणा केलीय. येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीत श्रीलंकेला यजमानपद देण्यात आलंय. या स्पर्धेतील अंतिम सामना 11 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारत पुन्हा एकदा पाकिस्तानशी भिडणार आहे.आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीत श्रीलंकेला यजमानपद देण्यात आलंय.
दरम्यान, 1984 मध्ये पहिल्यांदा झालेली आशिया चषक स्पर्धा 50 षटकाची खेळवण्यात आली होती. परंतु 2016 मध्ये ती प्रथमच T20 फॉर्मेटमध्ये खेळवण्यात आली होती. यंदाही आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. 2020 मध्ये या स्पर्धेच आयोजन करण्यात येणार होतं. परंतु, कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर टी-20 विश्वचषक 2021 मुळं ही स्पर्धा पुन्हा पुढं ढकलण्यात आली होती.
आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. ही स्पर्धा आतापर्यंत 14 वेळा आयोजित करण्यात आलीय. श्रीलंकेनं चार वेळा यजमानपद भूषवलंय. C2010 नंतर प्रथमच श्रीलंकेत या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल. या स्पर्धेत भारतीय संघ सर्वाधिक सात वेळा चॅम्पियन ठरलाय. याशिवाय, श्रीलंका (5) आणि पाकिस्तानच्या संघानं दोनदा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय.
हे देखील वाचा-
- IND W vs AUS W World Cup : चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलिया महिला संघानं केला भारतीय संघाचा पराभव, मेग लेनिंगची दमदार खेळी
- IND W vs AUS W World Cup : ऑस्ट्रेलिया महिला संघाची दमदार सुरुवात, 17 षटकात बिनबाद 111 धावा
- महिला वर्ल्ड कपमध्ये बेबी सेलिब्रेशन, एफी फ्लेचरचा व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha