Alia Bhatt Upcoming Films : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) सिनेमा नेहमीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. नुकताच आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्येदेखील समावेश केला आहे. लवकरच आलियाचे आणखी पाच सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 


आरआरआर ( RRR) : आलिया भट्टचा 'आरआरआर' हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आलिया सीता हे पात्र साकारणार आहे. या सिनेमात आलिया साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे. 


ब्रह्मास्त्र : 'ब्रह्मास्त्र' हा आलिया भट्टच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात आलिया तिचा प्रियकर रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.  दोघांनी पहिल्यांदाच एका सिनेमात एकत्र काम केले आहे. हा सिनेमा 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.





 डार्लिंग्स : आलियाच्या आगामी सिनेमांत 'डार्लिंग्स' सिनेमाचादेखील समावेश आहे. या सिनेमात आलियासोबत शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


रॉकी और रानी की प्रेम कहानी : आलिया भट्ट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग अजूनही सुरू आहे. या सिनेमात आलिया 'राणी' तर रणवीर 'रॉकी'च्या भूमिकेत दिसणार आहे.


तख्त : तख्त हा करण जोहर दिग्दर्शित सिनेमा आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. सिनेमात आलिया भट्ट व्यतिरिक्त करीना कपूर, रणवीर सिंह, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


RRR : 'आरआरआर' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट महागणार


Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, निवेदिता सराफ महत्त्वपूर्ण भूमिकेत


Netflix : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर कराल तर... , कंपनी आणणार नवीन फिचर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha