हीनानं पात्रता फेरीत 380 गुणांसह 14 वं स्थान मिळवलं. पहिल्या आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या असून हीनाला पाच गुणांनी अंतिम फेरीच्या तिकीटानं हुलकावणी दिली आहे.
पहिल्या आठ जणींचीच निवड पुढच्या फेरीसाठी होते. शनिवारी झालेल्या 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये आयोनिका पॉल आणि अपूर्वी चंडेला यांच्याही पदरी निराशा आली होती. तर नेमबाज जीतू रायचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं आहे. जितू रायला अंतिम फेरीत 78.7 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.