एक्स्प्लोर

RCB vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर पाच गडी राखून पराभव

सनरायझर्स हैदराबादकडून सलामीवीर वृद्धिमान साहाने सर्वाधिक 39 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला.

RCB vs SRH: आयपीएल 2020 च्या 52 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पाच गडी राखून पराभव केला. या मोसमातील हैदराबादचा हा सहावा विजय असून पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 120 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादने 14.1 षटकांत पाच गडी राखून सहज लक्ष्य साध्य केलं.

तत्पूर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. तिसर्‍याचं षटकात 13 धावसंख्या असताना सलामीवीर देवदत्त पडिकल 8 चेंडूत 5 धावांवर बाद झाला. त्याला संदीप शर्माने बोल्ड केलं. यानंतर कर्णधार विराट कोहलीही पाचव्या षटकात अवघ्या 7 धावा करून पव्हेलियनमध्ये परतला. तोही संदीप शर्माची शिकार झाला.

28 धावांत 2 गडी तंबूत परतल्यानंतर जोश फिलिप आणि एबी डिव्हिलियर्स यांनी तिसर्‍या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. मात्र, डिव्हिलियर्स शाहाबाज नदीमच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 24 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर फिलिपही पव्हेलियनमध्ये परतला. त्याने 31 चेंडूत 32 धावा केल्या.

ठराविक अंतराने हे दोघे बाद झाल्यानंतर आरसीबीची घसरण सुरु झाली. त्यानंतर ख्रिस मॉरिस 3 आणि इसुरु उडाना 0 धावांवर परतले. गुरकीरत सिंग 15 धावा करून नाबाद राहिला. पण त्याने खूप हळू फलंदाजी केली. गुरकीरतने 62.50 च्या स्ट्राइक रेटने धावा जमवल्या.

IPL 2020, MIvsDC : मुंबईचा दिल्लीविरुद्ध 9 विकेट्सनी दणदणीत विजय

त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादकडून संदीप शर्माने कमालीची गोलंदाजी केली. त्याने त्याच्या चार षटकांत 20 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याशिवाय जेसन होल्डरने आपल्या कोट्याच्या चार षटकांत 27 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याचबरोबर टी नटराजनने चार षटकांत केवळ 11 धावा देऊन एक गडी बाद केला.

त्यानंतर हैदराबादने बंगळुरूच्या 121 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग सुरू केला. दुसर्‍या षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 8 धावा केल्या आणि वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर तो बाद झाला. यानंतर मनीष पांडे आणि वृद्धिमान साहाने दुसर्‍या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. पांडे 19 चेंडूत 26 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

साहाने 32 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने 1 चौकार आणि एक षटकार लगावला. हे दोघे बाद झाल्यावर केन विल्यमसन 08 आणि अभिषेक शर्मा 08 स्वस्तात तंबूत परतले. पण शेवटी जेसन होल्डरने 10 चेंडूत नाबाद 26 धावांची खेळी करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. होल्डरने 260.00 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. या दरम्यान त्याच्या फलंदाजीमधून एक चौकार व तीन षटकार लगावले.

महत्त्वाच्या बातम्या

Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget