एक्स्प्लोर

निलंबनाच्या कारवाईनंतर जाडेजाचा फिल्मी डायलॉग

कोलंबो कसोटीतल्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर किताबाचा मानकरी ठरलेल्या रवींद्र जाडेजावर त्याच कसोटीतल्या अखिलाडूवृत्तीसाठी आयसीसीने एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

कोलंबो : मैदानातील अखिलाडूवृत्तीसाठी टीम इंडियाचा फिरकीपटू रवींद्र जाडेजावर एका कसोटीसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जाडेजाने फिल्मी स्टाईलमध्ये ट्विटरद्वारे आपलं दुःख व्यक्त केलं आहे. जाडेजाने 'हम शरीफ क्या हुए सारी दुनिया ही बदमाश हो गई’ या शाहरुख खानच्या डायलॉगने त्याच्या निलंबनावर प्रतिक्रिया दिली आहे. या डायलॉगसोबत जाडेजाने कोणतीही कॅप्शन लिहिलेली नाही. मात्र त्याने अप्रत्यक्षपणे निलंबनावर नाराजी व्यक्त केली. https://twitter.com/imjadeja/status/894460067264643072 कोलंबो कसोटीतल्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर किताबाचा मानकरी ठरलेल्या रवींद्र जाडेजावर त्याच कसोटीतल्या अखिलाडूवृत्तीसाठी आयसीसीने एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई केली आहे. श्रीलंका दौऱ्यातल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत जाडेजाला या कारवाईमुळे खेळता येणार नाही. कोलंबो कसोटीत जाडेजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अडवलेला चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेने अतिशय धोकादायक पद्धतीनं थ्रो केला होता. या प्रकरणात आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे जाडेजाला तीन दंड गुण आणि कसोटी मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. पण गेल्या 24 महिन्यांत जाडेजाच्या बेशिस्त वर्तनासाठीच्या एकूण दंड गुणांची संख्या सहावर गेली. त्यामुळे आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याच्यावर एका कसोटीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोलंबो कसोटीत जाडेजानेच श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्याने 152 धावांत श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. रवीचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन विकेट्स काढून विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

संबंधित बातमी : अखिलाडीवृत्तीसाठी रवींद्र जाडेजावर निलंबनाची कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka A vs India A 2nd Test : एकाने धावा केल्या, दुसऱ्याने 10 विकेट्स घेतल्या; सुदर्शन-गुरनूर ब्रारने श्रीलंकेच्या संपूर्ण टीमला गुडघ्यावर आणले, टीम इंडियाचा एकतर्फी विजय
एकाने धावा केल्या, दुसऱ्याने 10 विकेट्स घेतल्या; सुदर्शन-गुरनूर ब्रारने श्रीलंकेच्या संपूर्ण टीमला गुडघ्यावर आणले, टीम इंडियाचा एकतर्फी विजय
IND VS ENG 3rd T20 Vaibhav Sooryavanshi : मँचेस्टरमध्ये नुसती झलक दाखवली, आता नॉटिंगहॅममध्ये होणार खरा राडा; वैभव सूर्यवंशी पुन्हा कधी ॲक्शनमध्ये दिसणार? वाचा A टू Z
मँचेस्टरमध्ये नुसती झलक दाखवली, आता नॉटिंगहॅममध्ये होणार खरा राडा; वैभव सूर्यवंशी पुन्हा कधी ॲक्शनमध्ये दिसणार? वाचा A टू Z
Pakistan Test Squad Update : शान मसूद OUT, किंग बाबर IN! पाकिस्तान क्रिकेटमध्ये रातोरात मोठा भूकंप; थेट कसोटी टीमचा कर्णधार बदलला, आझमच्या हाती कमान
शान मसूद OUT, किंग बाबर IN! पाकिस्तान क्रिकेटमध्ये रातोरात मोठा भूकंप; थेट कसोटी टीमचा कर्णधार बदलला, आझमच्या हाती कमान
Vaibhav Sooryavanshi : पदार्पणानंतर डोळ्यात पाणी! वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी देशासाठी खेळणारा वैभव सूर्यवंशी पोस्ट शेअर करत भावुक, म्हणाला, नशीबवान आहे की...
पदार्पणानंतर डोळ्यात पाणी! वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी देशासाठी खेळणारा वैभव सूर्यवंशी पोस्ट शेअर करत भावुक, म्हणाला, नशीबवान आहे की...

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Dhiraj Lingade: शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
Embed widget