एक्स्प्लोर
... म्हणून इंग्लंडला आर. अश्विनची धडकी
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 07 Nov 2016 02:21 PM (IST)
1/10

अलीकडेच न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसरीकडे इंग्लड आणि बांग्लादेश यांच्यातील मालिका अनिर्णीत राहिली.
2/10

मागील इंग्लंडसोबतच्या मालिकेपासून सुरु झालेला त्याचा चांगल्या कामगिरीचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे.
3/10

भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट मैदानात होत आहे.
4/10

अश्विनने 2012-13 मध्ये सर्वाधिक विकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत घेतल्या. त्याने या मालिकेत एकूण 29 बळी घेतले.
5/10

पण 9 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींची नजर टीम इंडियाचा सर्वात यशस्वी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या कामगिरीवर असेल.
6/10

गेल्या चार वर्षात अश्विनने चांगली कामगिरी करत, प्रत्येक मालिकेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा पराक्रम केला.
7/10

ऑस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्याची कामगिरी चांगली होती. 2013-14 मध्ये अश्विनने सर्वोत्तम कामगिरी करत 12 विकेटस घेतल्या.
8/10

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या संघालाही अश्विननेच्या प्रभावी माऱ्याचा सामना करावा लागला. या मालिकेत अश्विनने दक्षिण अफ्रिकेचे 31 बळी घेतले.
9/10

दक्षिण अफ्रिकेनंतर न्यूझीलंड संघालाही अश्विनने आपल्या तालावर नाचवलं. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनने 27 गडी बाद केले.
10/10

अश्विनच्या या धमाकेदार कामगिरीमुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्या फिरकीमुळे इंग्लंड संघ गारद होईल अशी अपेक्षा सर्वांना आहे.
Published at : 07 Nov 2016 02:21 PM (IST)
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
क्रीडा
विषयच खोल! मुंबईच्या 4 शिलेदारांनी हिमाचल टीमचा डायरेक्ट कार्यक्रमच केला, 1 डाव आणि 98 धावांनी विजय
क्रीडा
हार्दिक पांड्याच्या कमबॅकचा मुहूर्तच सापडेना, फक्त IPL खेळण्यासाठीच फिट होणार? 3 मालिकेतून OUT, विश्वचषकापूर्वी वाढलं टेन्शन
क्रीडा
गौतम गंभीरच्या एन्ट्रीनंतर वैभव सूर्यवंशी प्लेइंग-11 मधून बाहेरच; श्रेयस अय्यरने सांगितलं कारण, जे ऐकून सगळेच चक्रावले!






















