एक्स्प्लोर
Advertisement
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री, झहीर खान गोलंदाजी सल्लागार
मुंबई: टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण, हा सस्पेन्स अखेर दूर झाला आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीनं कर्णधार विराट कोहलीच्या पसंतीवरच म्हणजे रवी शास्त्री यांच्या नावावर आपली मोहोर उमटवली आहे. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या या समितीने शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर त्याच बरोबर गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीर खानची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल द्रविड हा भारतीय संघाच्या महत्त्वाच्या दौऱ्यांमध्ये फलंदाजी सल्लागाराची भूमिका बजावेल.
विराट कोहलीशी झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर अनिल कुंबळेने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया मुख्य प्रशिक्षकाविनाच विंडीज दौऱ्यावर गेली होती. आता आगामी श्रीलंका दौऱ्यापासून शास्त्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारतील. 2019 च्या विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री आणि झहीर खानची नियुक्ती करण्यात आली आहे.
टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांशीही रवी शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत. ऑगस्ट 2014 ते जून 2016 या काळात टीम इंडियाचे संचालक म्हणून काम केलेल्या रवी शास्त्री यांचे संघातील खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. याचाच फायदा त्यांना झाला आहे.
टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मूडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांनी अर्ज केले होते. अखेर बीसीसीआयनं रवी शास्त्री यांच्याच नावावर शिक्कमोर्तब केलं आहे.
रवी शास्त्रींची कारकीर्द :
रवी शास्त्री हे भारतीय संघातील एक उत्कृष्ट अष्ट्रपैलू खेळाडू होते. त्यांनी 80 कसोटी आणि 150 वनडे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी 6000 हून अधिक धावा आणि 280 गडी बाद केले आहेत. भारतानं 1983 मध्ये पहिला विश्वचषक पटकावला. त्यावेळी या संघात रवी शास्त्रींचाही समावेश होता.
झहीर खानची कारकीर्द:
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची आता भारतीय संघाचा गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. झहीर खानने आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत मोठं योगदान दिलं आहे. याचाच विचार करुन सीएसीने झहीर खानला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. झहीर खानने 92 कसोटीत 311 बळी तर 200 वनडेत 282 बळी त्यानं घेतले आहेत. तर 17 टी-20 सामन्यात 17 बळी त्याच्या नावावर आहे.
संबंधित बातम्या:
'कोहली नाही, तेंडुलकर-गांगुली-लक्ष्मण हेच टीम इंडियाचा कोच ठरवतील'
बीसीसीआय विराट कोहलीचा हट्ट पूर्ण करणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
पुणे
रत्नागिरी
Advertisement