एक्स्प्लोर
Advertisement
आर अश्विनने कपिल देव यांचा विक्रम मोडला!
पुणे : भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने माजी कर्णधार कपिल देव यांचा, मायदेशातल्या कसोटी मोसमात सर्वाधिक विकेट्सचा विक्रम मोडीत काढला. अश्विनने पुणे कसोटीत मिचेल स्टार्कला बाद करुन कपिल देव यांच्याही एक पाऊल पुढे टाकलं.
यंदाच्या मोसमात अश्विनच्या नावावर मायदेशातल्या दहा कसोटींमध्ये 64 विकेट्स जमा झाल्या आहे. त्याने कपिल देव यांचा 37 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.
कपिल देव यांनी 1979-80च्या मोसमात भारतातील 13 कसोटींमध्ये सर्वाधिक 63 विकेट्स काढल्या होत्या.
अश्विनने तो विक्रम मोडला आहेच, पण विशेष म्हणजे त्याने कारकीर्दीत दुसऱ्यांदा मायदेशातील कसोटी सामन्यात साठहून अधिक विकेट्स काढल्या आहेत. याआधी 2012-13 या मोसमात अश्विनने भारतातील 10 कसोटी सामन्यांमध्ये 61 विकेट्स काढल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
पुणे
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets