German Open Badminton: भारताच्या आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu), सायना नेहवाल (Saina Nehwal) या दोघींना जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत (German Open Badminton Tournament) पराभव पत्करावा लागला आहे. पी.व्ही. सिंधु (PV Sindhu) हीला चीनच्या झांगने (Zhang Yi Man) तर सायनाला थायलंडच्या रतचानोक इंतानोन हीने मात दिली आहे. तर किदम्बी श्रीकांतने (Kidambi Shrikanth) चीनच्या चीन के लू गुआंग झू याला नमवलं आहे.




सिंधू आणि झांग यांच्यातील सामन्यात झांगने 21-14, 15-21, 21-14 अशा तीन सेट्समध्ये विजय मिळवला आहे. तर सायनाला थायलंडच्या इंतानोनने 10-21, 15-21 अशा दोन सरळ सेट्मध्ये नमवत स्पर्धेबाहेर केलं आहे. तर दुसरीकडे श्रीकांतने मात्र अप्रतिम विजय मिळवत पुढील फेरीत स्थान मिळावलं आहे. श्रीकांतने बॅडमिंटन क्रमवारीत जगात 27 व्या क्रमाकांवर असणाऱ्या गुआंग झू (Lu Guang Zu) याला मात दिली आहे. 67 मिनिटं चाललेल्या सामन्यात श्रीकांतने  21-16, 21-23, 21-18 अशा तीन सेट्समध्ये विजय मिळवला. या सामन्यातील विजयामुळे किदम्बी श्रीकांतने थेट क्वार्टर फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे.  


हे देखील वाचा-



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live