ICC Player of the Month: आयसीसीनं 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केलीय. या यादीत भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. दरम्यान, महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंसाठी सहा खेळाडूंना नामांकन मिळालं आहे. ज्यात श्रेयस अय्यर, मिताली राज आणि दिप्ती शर्मा या तीन भारतीयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आयसीसीनं पुरुष आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी यूएईच्या वृत्या अरविंद आणि नेपालच्या दीपेंद्र सिंह यांच्याही नावाची घोषणा केलीय. श्रेयस अय्यरनं श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी केली होती. तर, मिताली राजनंही न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. 


श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरची जबरदस्त कामगिरी
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरनं 174.35 च्या स्ट्राइक रेटनं 204 धावा केल्या होत्या. ज्यामुळं त्याला मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. या तिन्ही सामन्यात त्यानं नाबाद अर्धशतकी खेळी होती. 


न्यूझीलंडविरुद्ध मिताली राजची चमकदार कामगिरी
न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत मिताली राज सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. तिनं पाच सामन्यात 77.33 च्या सरासरीनं 232 धावा केल्या होत्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं भारताला पराभूत केलं. मात्र, अखेरच्या सामन्यात मिताली राजच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारताचा विजय मिळवला होता. या सामन्यात मितालीनं नाबाद 54 धावांची खेळी केली होती. 


दीप्ती शर्माची अष्टपैलू खेळी
न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत दिप्ती शर्मानं भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिनं पाच सामन्यात 10 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच या मालिकेत तिनं 116 धावा देखील केल्या. ज्यात एक अर्धशतकाचा समावेश आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिला चार विकेट्स मिळाल्या होत्या.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha