Pro Kabaddi League Season 8, Telugu Titans performance so far: प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामाचा अर्धा प्रवास संपलाय. या हंगामात दबंग दिल्ली, बेंगळुरू बुल्स आणि पाटणा पायरेट्सनं चमकदार कामगिरी करून दाखवली आणि सुरुवातीपासूनच पहिल्या 6 संघांमध्ये आपले स्थान कायम ठेवलंय. मात्र, या हंगामात तेलुगू टायटन्स, पुणेरी पलटन आणि गुजरात जायंट्सनं निराशाजनक कामगिरी केलीय. या लीगचा पहिला अर्ध टप्पा पार पडला असून तेलगु टायन्सनं आतापर्यंत कशी कामगिरी केली? यावर एक नजर टाकुयात. 


सुरुवातीलाच बसला मोठा धक्का
प्रो कबड्डीच्या तेलुगू टायटन्सनं त्यांच्या चाहत्यांना खूप निराश केलंय. सिद्धार्थ देसाई आणि रोहित कुमार सारख्या दिग्गज रेडर्ससह हंगामाची सुरुवात करणाऱ्या तेलुगु टायटन्सला पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी 10 सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली. महत्वाचं म्हणजे, तेलुगू टायटन्सच्या तिसऱ्या सामन्यातच दुखापत झाल्यानं सिद्धार्थ देसाईला संघाबाहेर जावं लागलं. यामुळं संघाला मोठा धक्का बसला. 


पहिल्या विजयासाठी 10 व्या सामन्याची प्रतिक्षा
प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात तेलुगु टायटन्सला पहिल्या 9 सामन्यांमध्ये 7 सामन्यात संघाचा पराभव झाला आणि 2 सामने टाय झाले. जयपूर पिंक पँथर्सचा पराभव करून मोसमातील पहिला विजय नोंदवणाऱ्या तेलुगू टायटन्सला पुढील दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावं लागलं. तर शेवटचा सामना अनिर्णित राहिला. तेलुगू टायटन्स हा या हंगामातील एकमेव संघ आहे जो सुरुवातीपासून आतापर्यंत शेवटच्या स्थानावर राहिलाय. या संघानं आतापर्यंत 14 सामने खेळले असून केवळ एकच सामना जिंकलाय.


प्लेऑफचा रस्ता कठीण
अलीकडची कामगिरी पाहता हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल, असं वाटत नाही. उर्वरित 8 सामने जिंकून संघाचे 62 गुण होतील. परंतु, संघ ज्या पद्धतीनं खेळत आहे, ते पाहता हे काम थोडं कठीणचं वाटत आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA