पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar)आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सध्याच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. 'रावळपिंडी एक्सप्रेस' या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएबने म्हटले आहे की, सचिन तेंडुलकर जर आजच्या काळात क्रिकेट खेळत असता तर त्याने एक लाखांहून अधिक धावा केल्या असत्या. सध्याच्या क्रिकेटच्या नियमांवर शोएब अख्तर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत या नियमांचा फायदा फक्त फलंदाजांना होत आहे, असं त्याचं मत आहे.
शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “तुम्ही आता वन डे क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडूंसह खेळता. तुम्ही नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे सध्या फलंदाजांवर जास्त लक्ष दिलं जात आहे. आता तीन रिव्ह्यूचा नियमही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, सचिन तेंडुलकरच्या काळात हाच नियम असता तर त्याने एक लाखांहून अधिक धावा केल्या असत्या, असं शोएब म्हणाला.
शोएब म्हणाला, “मला सचिनची खरोखर दया येते, तो सुरुवातीला वसीम अक्रम आणि वकार युनिसविरुद्ध खेळला. तो शेन वॉर्नविरुद्ध खेळला, त्यानंतर त्याचा सामना ब्रेट ली आणि माझ्याशी झाला. त्यानंतर तो वेगवान गोलंदाजांच्या पुढच्या पिढीतही खेळला. म्हणूनच मी त्यांना खूप चांगला फलंदाज मानतो."
सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके आहेत. त्याने वन डे क्रिकेटमध्ये 18 हजार आणि कसोटी क्रिकेटमध्ये 15 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
याशिवाय शोएब अख्तरने क्रिकेटमध्ये बाऊन्सर्स चेंडू टाकण्याची संख्या वाढवण्याचीही मागणी केली आहे. क्रिकेटचा समतोल साधायचा असेल तर, बाऊन्सर्सची संख्या वाढवायला हवी, असे तो म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
- U19 World Cup: भारत-पाकिस्तान सेमीफायनलचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर समीकरण बदललं
- Women Asia Cup : तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात भारताची चीनवर मात, कांस्य पदकावर कोरलं नाव
- Ronaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोचा अनोखा अंदाज, बुर्ज खलिफावर चित्र झळकावून गर्लफ्रेन्डला दिल्या शुभेच्छा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha