Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला 22 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यावेळी 12 संघ ट्रॉफीसाठी आमने-सामने असणार आहेत. तर आयपीएलप्रमाणे कबड्डी लीगचे मालक मात्र अनेकांना माहित नाहीत. पण यामध्ये सुपरस्टार अक्षय कुमार अल्लू अर्जून तसचं क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचाही समावेश आहे. तर नेमकं कोण कोणत्या संघाचं मालक आहे याची संपूर्ण यादी पाहूया...


बंगाल वॉरियर्स : बॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमार या संघाचा मालक आहे. अक्षयसोबत फ्यूचर ग्रुपची कंपनी बर्थराइट गेम्स अॅन्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे देखील या संघाचे सहमालक आहेत.


बंगळुरु बुल्स : या संघाचे मालक कॉस्मिक ग्लोबल मीडिया कंपनी आहे. भारतातील एक यशस्वी मीडिया प्रोडक्शन हाऊसमधील एक असणारी ही कंपनी शॉर्ट फिल्म आणि डॉक्यूमेंट्री बनवत असते.


दबंग दिल्ली : राधा कपूर खन्ना ही या संघाची मालक असून एकमेव महिला आहे जी प्रो कबड्डीमधील संघाची मालक आहे. राधा या त्यांची कंपनी DO IT स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीतर्फे या संघाला लीड करते.


गुजरात जायंट्स : प्रो कबड्डीच्या पाचव्या सीजनमध्ये सामिल झालेला संघ गुजरात जायंट्सचा मालक गौतम अदाणी हे आहेत.


हरियाणा स्टिलर्स : जेएसडब्लू ग्रुपकडे या कंपनीचे मालकी हक्क आहेत. जेएसडब्लू ग्रुप याआधीही काही संघाचे मालक राहिले आहेत.


जयपुर पिंक पँथर्स : बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन आणि जीएस एंटरटेनमेंट या दोघांकडे या संघाचे मालकि हक्क आहेत.


पटना पायरेट्स : केवीएस एनर्जी अँड स्पोर्ट्स लिमिटेड यांच्यासह राजेश शाह या संघाचे मालक आहेत.


पुणेरी पल्टन : कैलाश कंदपाल हे इनश्योरकोट स्पोर्ट्स कंपनीच्या मदतीने या संघाचं सारं काम पाहतात


तामिळ थलाइवाज : या संघाचे मालक सचिन तेंडुलकर, अल्लु अर्जुन, राम चरण आणि नीम्मगडा प्रसाद हे सारे मिळून आहेत.


तेलगु टाइटन्स : प्रो कबड्डी लीगमधील या संघाचे मालकी हक्क तीन कंपन्यांकडे आहेत. या कंपन्यांची नावं ग्रीनको ग्रुप, एनईडी ग्रुप, कोर ग्रीन ग्रुप अशी आहेत.


यू मुंबा : रोनी स्क्रूवाला या संघाचा मालक आहे. ते आपली कंपनी यूनीलेजर वेंचर लिमिटेडच्या मदतीने संघाचं काम पाहतात.


यूपी योद्धा : स्पोर्ट्स कंपनी जीएमआर लीग गेम्स यूपी योद्धाची मालक आहे.


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI