Pro Kabaddi League 2021 :  आठव्या हंगामातील पाचव्या सामन्यात दबंग दिल्ली (Dabang Delhi) संघाने पुणेरी पलटण (Puneri Paltan) संघाचा 11 गुणांनी पराभव केलाय. बंगळुरु येथे रंगलेल्या सामन्यात पुणेरी पलटणचा 41-30 ने पराभव करत दंबग दिल्लीने यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली आहे. रायडर नवीन कुमारच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर दबंग दिल्लीने यंदाच्या हंगामातील पहिला विजय साजरा केलाय. रायडर नवीन कुमारने दंबग दिल्लीसाठी सर्वाधिक 16 गुणांची कमाई केली. त्याशिवाय ऑलराऊंडर विजय यानेही 9 गुण मिळवत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. 


आठव्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात दंबग दिल्ली संघातील खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलं. पहिल्या हाफमध्ये दिल्लीने 7 गुणांची आघाडी घेतली होती. अखेरपर्यंत दिल्ली संघाने पुणेरी पलटणवर वर्चस्व गाजवलं. दुसऱ्या हाफमध्ये पुणेरी पलटणने पुनरागमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दंबग दिल्लीच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत पुणेरी पलटणचं आव्हान मोडीत काढलं. अखेर दिल्लीने पुणेरी पलटणचा 41-30 असा पराभव केला.  


जोगिंदर नरवालच्या नेतृत्वातील दंबग दिल्ली संघाने पहिल्या हाफमध्ये 22 गुण मिळवले होते. यामध्ये रेडद्वारा 13, टॅकलमधून पाच आणि ऑलआऊटद्वारे चार गुणांचे कमाई केली होती. तर पुणेरी पलटण संघाने पहिल्या हाफमध्ये 15 गुण मिळवले होते. यामध्ये रेडच्या माध्यमातून 12 आणि टॅकलचे दोन गुण होते. पहिल्या हाफप्रमाणेच दुसऱ्या हाफमध्येही दिल्लीच्या संघानं उत्कृष्ट प्रदर्शन केलं. दबंग दिल्लीने दुसऱ्या हाफमध्ये रेडमार्फत 12, टॅकलमधून चार आणि ऑलआऊटमधून दोन गुण मिळवले होते. पुणेरी पलटणने दुसऱ्या हाफमध्ये रेडमधून 9, टॅकलमार्पत तीन आणि ऑलआऊटमधून दोन गुण मिळवले होते. त्याशिवाय दोन्ही संघाला अतिरिक्त प्रत्येकी एक-एक गुण मिळला.  






संबधित बातम्या :


Pro Kabaddi League : अक्षय कुमार, अल्लू अर्जुनपासून सचिन तेंडुलकरपर्यंत 'हे' आहेत प्रो कबड्डी संघाचे मालक, पाहा यादी
Pro Kabaddi League : अभिषेक बच्चनच्या जयपुर पिंक पँथर्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का, गुजरात जायंट्सची बाजी