नवी दिल्ली : युनियन पब्लिक सर्व्हिस कमीशनने कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेसाठी 341 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या संबंधी एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून त्यानुसार आपण अर्ज करु शकता. यासाठी यूपीएससीच्या ऑफिशिअल वेबसाईटला upsc.gov.in भेट द्यावी लागेल.
या जाहिरातीच्या माध्यमातून 341 पदं भरण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 जानेवारी 2022 आहे. या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 200 रुपये इतकी परीक्षा फी आकारण्यात येत आहे.
अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरील सूचना नीट वाचा.
- अर्ज करताना कोणताही कॉलम मोकळा सोडू नका.
- एका पेक्षा जास्त अर्ज करण्यात येणार नाही.
- अर्ज करताना फोटो हा 300 केबी आणि सही ही 20 केबी पेक्षा जास्त नसावी.
- अर्ज करताना एक आयडी फ्रुफ म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, किंवा सरकारद्वारा अधिकृत केलेले आयडी कार्ड असणं गरजेचं आहे.
अर्ज कसा करावा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला यूपीएससी https://www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. हा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला येथे फॉर्म भरण्याशी संबंधित संपूर्ण माहिती आणि या भरतीची अधिसूचना मिळेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना पूर्णपणे वाचली पाहिजे. अनुप्रयोगात काही चूक असल्यास तो नाकारला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
- Upcoming Government Jobs 2022 : नव्या वर्षात सरकारी नोकऱ्यांचा पाऊस; पाहा संपूर्ण यादी
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतीनंतरही विलंब शुल्क आकारले जाणार नाही
- MPSCकडून गट क संवर्गातील रिक्त असलेल्या 900 पदांसाठी MPSCची जाहिरात, रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी