एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चौथ्या कसोटीपूर्वी पृथ्वी शॉचा कसून सराव
संघात निवड झाल्यानंतर पृथ्वी शॉ भारतीय संघाच्या ताफ्यात सहभागी झाला आहे. त्याने काल मैदानावर कसून सरावही केला.
साऊथेम्पटन : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 30 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा नव्याने करण्यात आली, ज्यात मुंबईकर पृथ्वी शॉचाही समावेश आहे.
संघात निवड झाल्यानंतर पृथ्वी शॉ भारतीय संघाच्या ताफ्यात सहभागी झाला आहे. त्याने काल मैदानावर कसून सरावही केला. सलामीवीर फलंदाज मुरली विजयला वगळल्यानंतर पृथ्वी शॉची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पृथ्वी शॉच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इंग्लंडविरुद्धचे उर्वरित दोन कसोटी सामने 30 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर रोजी अनुक्रमे साऊथेम्पटन आणि लंडनमध्ये खेळवण्यात येणार आहेत. नॉटिंगहॅम कसोटीत भारताने आजच इंग्लंडवर विजय मिळवला. त्यानतंर नॉटिंगहॅममध्येच निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली.📸📸
Snapshots from #TeamIndia's training session at The Ageas Bowl today.#ENGvIND pic.twitter.com/ngCDwgmcJh — BCCI (@BCCI) August 27, 2018
विश्वविजेत्या अंडर-19 भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ सध्या दमदार फॉर्मात आहे. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या प्रथम श्रेणी सामन्यातही त्याने शतकी खेळी केली होती. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. रणजी आणि दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉच्या नावावर आतापर्यंत सात शतकं आणि पाच अर्धशतकं आहेत. उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, हनुमा विहारी, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर संबंधित बातमी : मुरली विजयला डच्चू, पृथ्वी शॉ भारतीय संघात!Young @PrithviShaw gearing up for the nets session here at The Ageas Bowl.#ENGvIND pic.twitter.com/p5DdaReDrJ
— BCCI (@BCCI) August 27, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement