एक्स्प्लोर
Advertisement
पृथ्वी शॉवर आठ महिन्यांची निलंबनाची कारवाई
मुंबईचा आणि टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉला उत्तेजक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने आठ महिन्यांसाठी निलंबित केले आहे.
मुंबई : मुंबईचा आणि टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉला उत्तेजक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने आठ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. श्वसननलिकेच्या संसर्गावर घेतलेल्या औषधातून आपण अजाणतेपणी टर्ब्युटॅलिनचे सेवन केल्याचे पृथ्वीने मान्य केले आहे.
खोकल्याच्या औषधात टर्ब्युटॅलिनचा सर्रास वापर करण्यात येतो. इंदूरमधल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या कालावधीत झालेल्या उत्तेजक चाचणीत पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटॅलिनचे अंश सापडले होते.
वर्ल्ड अँटी डोपिंग असोसिएशनच्या नियमानुसार स्पर्धेच्या कालावधीत किंवा स्पर्धा नसतानाही टर्ब्युटॅलिनचे सेवन करण्यास मनाई आहे. त्यामुळे 16 मार्च ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बीसीसीआयकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पृथ्वी शॉने प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्याने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. हा पदार्थ खोकल्याच्या औषधामध्ये आढळतो. त्याने या पदार्थाचे सेवन केल्याने त्याच्याकडून डोपिंग नियमांचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या या कारवाईमुळे पृथ्वी शॉ बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या आगामी मालिकांना मुकणार आहे.
व्हिडीओ पाहा
— Prithvi Shaw (@PrithviShaw) July 30, 2019
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement