एक्स्प्लोर

प्रणव धनावडेने एमसीएची स्कॉलरशिप नाकारली

कल्याण शहरात खेळासाठी पोषक सुविधा नसल्याचं कारण त्याने दिलं आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.

कल्याण : एका डावात तब्बल 1009 धावा ठोकत क्रिकेटमध्ये विश्वविक्रम करणाऱ्या कल्याणच्या प्रणव धनावडेने एमसीएची (मुंबई क्रिकेट असोसिएशन) स्कॉलरशिप परत केली आहे. कल्याण शहरात खेळासाठी पोषक सुविधा नसल्याचं कारण त्याने दिलं आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आंतरशालेय सामन्यात खेळताना प्रणवने अवघ्या 323 चेंडूंमध्ये तब्बल 1009 धावा काढल्या होत्या. ज्यात 59 षटकार आणि 129 चौकारांचा समावेश होता. यानंतर त्याच्या कामगिरीची दखल घेत एमसीएने त्याला 5 वर्षांसाठी महिना 10 हजार रुपयांची स्कॉलरशिप दिली होती. वर्षभर ही स्कॉलरशिप प्रणवने स्वीकारली, मात्र यंदाच्या वर्षांपासून त्याने ही स्कॉलरशिप नाकारली आहे. कल्याण शहरात खेळासाठी पुरेशा सुविधा नसून ज्या मैदानात प्रणवने हा विश्वविक्रम केला, त्या मैदानाची अवस्था आज बिकट झाली आहे. त्यामुळे साहजिकच प्रणवच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. जर कामगिरीच देऊ शकत नसेल, तर स्कॉलरशिप का घ्यायची? असा विचार करून प्रणवने ही स्कॉलरशिप नाकारली आहे. प्रणवचे वडील प्रशांत धनावडे यांनी याबाबत कालच एमसीएला पत्र दिलं असून स्कॉलरशिप स्थगित करण्याची मागणी केली आहे. एबीपी माझाशी बोलताना या सगळ्याला केडीएमसी आणि स्थानिक राजकारण्यांची उदासिनता कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मात्र प्रणवला असा टोकाचा निर्णय न घेण्याची विनंती केली आहे. संबंधित बातम्या :

1009*च्या खेळीत प्रणव धनावडेला तब्बल 25 वेळा जीवदान!

विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेला सचिन तेंडुलकरचं गिफ्ट

प्रणव धनावडे आजचा एकलव्य? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

विक्रमवीर क्रिकेटपटू प्रणव धनावडे पोलिसांच्या ताब्यात

शरद पवार ते रितेश देशमुख, प्रणव धनावडेवर शुभेच्छांचा वर्षाव !

प्रणव यशाचं शिखर गाठ, क्रिकेटच्या देवाकडून कौतुक !

'माझं अधुरं राहिलेलं स्वप्न प्रणव पूर्ण करतोय'

महत्त्वाच्या बातम्या

India A vs Nepal Asia Cup : टी-20 गाजवलं, आता वनडेत धुमाकूळ घालणार वैभव-अभिषेक! आशिया कपच्या पहिल्याच लढतीत अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing-XI
टी-20 गाजवलं, आता वनडेत धुमाकूळ घालणार वैभव-अभिषेक! आशिया कपच्या पहिल्याच लढतीत अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing-XI
Ind vs NZ 1st Test : न्यूझीलंडचे 6 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत, तरीही 368 धावांचा डोंगर उभारला, दोन खेळाडूंनीच टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसं काढली
न्यूझीलंडचे 6 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत, तरीही 368 धावांचा डोंगर उभारला, दोन खेळाडूंनीच टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसं काढली
Glenn Phillips Ind vs NZ 1st Test : ग्लेन फिलिप्सने क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! भारताविरुद्ध असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज; दिग्गजांनाही टाकले मागे
ग्लेन फिलिप्सने क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! भारताविरुद्ध असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज; दिग्गजांनाही टाकले मागे
IND vs NZ 1st Test 2nd Day : अँगल बदलत फक्त डोकं लावलं अन् आकाशदीपने फिलिप्सला गुंडाळलं! सगळ्यांना चक्रावून सोडलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
अँगल बदलत फक्त डोकं लावलं अन् आकाशदीपने फिलिप्सला गुंडाळलं! सगळ्यांना चक्रावून सोडलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
Embed widget