एक्स्प्लोर
199 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतलेले 10 खेळाडू
नवी दिल्ली : दमदार इनिंग खेळलेला टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलचं द्विशतक चेन्नई कसोटीत केवळ एका धावेनं हुकलं. राहुल 199 धावांवर बाद झाला. यासोबत तो 199 धावांवर बाद होणारा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे 17 डिसेंबर 1986 रोजी श्रीलंकेविरुद्ध कानपूर कसोटीमध्ये 199 धावांवर बाद झाले होते. अझरुद्दीन यांनी करिअरमध्ये एकूण 22 शतक ठोकले. मात्र 199 धावांवर बाद झाल्यानंतर त्यांना परत कधीही द्विशतक करता आलं नाही.
अझरुद्दीन यांच्या करिअरमध्ये 192, 188, 152, 163 धावांच्या इनिंगसह त्यांच्या कारकीर्दीतील अखेरच्या कसोटीमध्येही शतक करुन द्विशतकापासून दूर रहावं लागलं.
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 199 धावांवर बाद कोण?
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 199 धावांवर बाद होण्याची वेळ पाकिस्तानचे फलंदाज मुदस्सर नजर यांच्यावर आली होती. 24 ऑक्टोबर 1984 रोजी भारताविरुद्ध खेळताना मुदस्सर यांची करिअरमध्ये द्विशतक ठोकण्याची संधी दुसऱ्यांदा हुकली होती.
ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू इलियट हे कसोटीत 199 धावांवर बाद होणारे तिसरे खेळाडू आहेत. अझरुद्दीन यांच्यानंतर इलियट हे असे खेळाडू आहेत, ज्यांना 199 धावांवर बाद झाल्यानंतर परत कधीही द्विशतक करता आलं नाही.
इलियट यांच्या सामन्यानंतर केवळ 16 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट 1997 रोजी श्रीलंकेचे फलंदाज सनथ जयसूर्या यांना भारताने 199 धावांवर बाद केलं. 199 धावांवर बाद होणारे ते चौथे खेळाडू ठरले. दरम्यान त्यांनी या सामन्यापूर्वी भारताविरुद्ध 340 धावांची दमदार इनिंग खेळली होती.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह वॉ 26 मार्च 1999 रोजी 199 धावांवर बाद होणारा पाचवा खेळाडू ठरला.
199 धावांवर नाबाद राहणारा पहिला खेळाडू
199 धावांवर बाद नव्हे तर नाबाद राहण्याचा विक्रम झिम्बाम्ब्वेचा खेळाडू एंडी फ्लावर याच्या नावावर आहे. 7 सप्टेंबर 2001 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरारेमध्ये खेळताना एंडी फ्लावरने झिम्बाम्ब्वेचा डावाने पराभव टाळला होता.
या सामन्यानंतर भारताने पाकिस्तानचा फलंदाज यूनूस खानला 13 जानेवारी 2006 रोजी झालेल्या सामन्यात 199 धावांवर बाद केलं. या सामन्यात पाकिस्तानकडून चार फलंदाजांनी शतक ठोकलं होतं तर भारताकडून वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी शतकी खेळी केली होती.
इंग्लंडचा फलंदाज इयान बेलचाही या यादीत आठवा क्रमांक लागतो. लॉर्ड्सच्या मैदानावर 10 जुलै 2008 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना बेल 199 धावांवर बाद झाला होता.
199 धावांवर नाबाद राहणारा दुसरा खेळाडू
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमारा संगकाराचाही या यादीत समावेश होतो. एंडी फ्लावरनंतर 199 धावांवर नाबाद राहणारा संगकारा दुसरा खेळाडू आहे. संगकाराच्या नावावर सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वाधिक द्विशतक ठोकण्याचा विक्रम आहे. संगकाराचे कसोटीत 11 तर ब्रॅडमन यांचे 12 द्विशतक आहेत.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथही 199 धावांवर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना 11 जून 2015 ला स्मिथ 199 धावांवर बाद झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement