उरी हल्ल्यातील शहिदांना खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली
व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही शहिदांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे की, ''उरी हल्ल्यासंदर्भात बातमी ऐकून अतिशय दु: ख झाले. शहिदांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्वच सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ!''
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय क्रिकेटचा तडाखेबाज माजी फलंदाज वीरुने आपल्या ट्वीटमध्ये, ”17 जीव, त्यांनाही कुटुंब होतं, त्यांनाही मुलं-बाळं होती. ते मातृभूमीची सेवा करत होते. पण हे दृश्य पाहून अतिशय वेदना होत आहेत.” असं म्हटलं आहे.
भारतीय कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली याने या घटनेचा निषेध करण्यासाठी शब्द नसल्याचं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीटरवरुन शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. सचिनने आपल्या ट्वीटमध्ये, ''देश आणि देशवासीयांचे रक्षण करणाऱ्या या शहिदांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो.''
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने म्हटले आहे की, ''उरी हल्ल्यात जवानांच्या बलिदानाची बातमी ऐकून दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.''
गौतम गंभीरनं आपला संताप व्यक्त करताना म्हटलं आहे की, ‘हे सर्व 17 शहीद जवान बाओपिकच्या लायक आहेत. एखादा क्रिकेटर नाही. यापेक्षा उत्कृष्ट प्रेरणा स्त्रोत दुसरा असूच शकत नाही. जे देशासाठी आपल्या उमदेचीच्या काळात आपले प्राण पणाला लावतात.
श्रीनगरपासून शंभर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील सैन्य दलाच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सोशल मीडियावर तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. क्रीडा जगतातूनही या घटनेचा निषेध करुन या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -