बॉलिवूडमधूनही उरी हल्ल्याचा निषेध
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये, स्वर्ग जळत आहे, काश्मीरमध्ये शोक व्यक्त होत आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडचा बादशाह किंग खान यानेही ट्वीट करुन या घटनेचा निषेध केला आहे. उरीमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याची बातमी एकून वेदना होत आहेत. या हल्ल्यात शहीदांच्या कुंटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच दहशतवाद्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळेल असं म्हटलं आहे.
मराठमोळ्या रितेश देशमुखने या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेता रणदीप हुड्डा याने हा हल्ला दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच जोपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु राहिल तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊच शकत नाही असे मत मांडले आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांनीही या घटनेचा निषेध करुन ट्वीट केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, ज्यांनी आपल्यासाठी बलिदान दिले, त्यांच्यासाठी आपण सदैव प्रार्थना करतो. मात्र, आपल्याला प्रचंड संताप आहे.
नेहा शर्मा हिनेही या हल्ल्याला भ्याड असल्याचे म्हणले आहे.
मधुर भांडारकर यांनेही या घटनेला भ्याड हल्ला असल्याचे सांगून शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजातील ए मेरे वतन केल लोगो हे गाणं ट्वीट करुन उरीमधील दहशतवादी हल्ला भ्याड असल्याचा ढळढळीत पुरावा असल्याचं म्हटलं आहे. तसेच या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जावे अशी भावना व्यक्त केली.
अनुष्काने आपल्य ट्वीटमध्ये, मी एका सैनिकाचीच मुलगी आहे. त्यामुळे मला एखाद्या कुटुंबातील सैन्यातील त्या व्यक्तीच्या जाण्याने त्यांच्यावर कोणते संकट कोसळते हे मी जवळून पाहिले आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी जे गमावलं आहे, त्यामुळे माझ्या मनाला अतिशय वेदना होत आहेत.
अनुष्काने दुसऱ्या एका ट्वीटमध्ये डगलस मॅकऑर्थर यांना कोट करुन, ''एक दृढ निश्चयी सैनिक शांतप्रिय असतो. कारण त्यालाच युद्धात एखाद्या सैनिकाला मारावे लागते, किंवा स्वत: चे बलिदान देऊन किंवा जखमी व्हावे लागते. इतर कुणाला नाही.''
उरी हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. देशातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतानाच याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मात्र, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला आपल्या भावना अनावर झाल्या आहेत.
या हल्ल्याचा अमीशा पटेलनेही तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच हा भ्याड हल्ला असल्याचंही तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हणलं आहे.
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार यानेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अक्षयने ट्वीट करुन शहीदांना श्रद्धांजली दिली आहे. अक्षयने आपल्या ट्वीटमध्ये शूरवीरांप्रति अंत:करणातून प्रार्थना, दहशतवाद्यांना रोखणे गरजेचे आहे. जे झालं ते पूरं झालं. जय हिंद!
प्रसिद्ध गायक अदनान सामी यानेही या हल्ल्यावर दु: ख व्यक्त केले असून शहिदांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
वत्सल सेठ याने या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -