PKL 11 Auction Crorepati Players : प्रो कबड्डी लीग 2024 च्या 11व्या हंगामाचा थरार लवकरच रंगणार आहे. त्यासाठी आता 16 ऑगस्ट रोजी मुंबईत लिलाव सुरू आहे आणि लिलावाच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला गेला आणि एकूण 8 खेळाडू करोडपती झाले. सचिन तन्वर हा लिलावात खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्यांच्याशिवाय पवनकुमार सेहरावत, सुनील कुमार आणि गुमान सिंग यांनाही चांगली किंमत मिळाली आहे.


तामिळ थलायवासने स्टार रेडर सचिन तन्वरसाठी 2 कोटी 15 लाखांची बोली लावली. सचिनची मूळ किंमत तीस लाख रुपये होती. PKL च्या इतिहासात सर्वाधिक रेड पॉइंट मिळवणारा खेळाडू परदीप नरवालला बेंगळुरू बुल्सने 70 लाख रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी अनुभवी बचावपटू सुरजीत सिंगला जयपूर पिंक पँथर्सने 60 लाख रुपयांना खरेदी केले.


पहिल्याच दिवशी आठ खेळाडू झाले करोडपती


या लिलावात पीकेएलच्या इतिहासात विक्रमी संख्येने खेळाडू 1 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाले. आजच्या खेळाडूंच्या लिलावात सचिन, मोहम्मदरेजा शादलूला, गुमान सिंग, पवन सेहरावत, भरत, मनिंदर सिंग, अजिंक्य पवार आणि सुनील कुमार हे एक कोटी रुपयांच्या क्लबचा भाग होते. 


सचिन तन्वरला 2.15 कोटी रुपये मिळाले. इराणचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मदरेजा शादलूला हरियाणा स्टीलर्सने 2.07 कोटी रुपयांना विकत घेतले. गुमान सिंगला गुजरात जायंट्सकडून लिलावात 1.97 कोटी रुपये मिळाले. 
पवन सेहरावतला तेलुगू टायटन्सने 1.725 कोटी रुपयांना विकत घेतले. भरतला 1.30 कोटी रुपये मिळाले. मनिंदर सिंगला 1.15 कोटी रुपये, अजिंक्य पवारला 1.107 कोटी रुपये आणि सुनील कुमारला यू मुंबाने 1.015 कोटी रुपये दिले.