Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. या विजयासह पुणेरी पलटणनं या स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला. तर, सलग पाच सामने जिंकणाऱ्या जयपूरचा विजयरथ थांबलाय. जयपूरचे स्टार खेळाडू पूर्णपणे अपयशी ठरले. तर, पुणेरी पलटनच्या युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करून दाखवली.
ट्वीट-
शेवटच्या मिनिटाला पुणेरी पलटनची आघाडी
या सामन्याची सुरुवात अतिशय संथ झाला. पहिल्या 10 मिनिटांत दोन्ही संघांनी संयमी खेळ दखवला. मात्र, त्यानंतर दोन्ही संघानी पॉईंट मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. 19व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांमध्ये फारसा फरक नव्हता. मात्र अखेरच्या मिनिटाला पुणेरी संघाने 16-11 अशी आघाडी घेतली. जयपूरच्या संघाचा डिफेंस निराशाजनक होता. साहुल कुनमारचे पाच टॅकल अयशस्वी ठरले. संघाचा स्टार रेडर अर्जून देशवालही फ्लॉप ठरला.त्याला केवळ दोन पॉईंट मिळवता आले. राहुल चौधरीनं चार गुण घेत एकाकी झुंज दिली. पुणेरी पटलनकडून अस्लम इनामदारनं दमदार कामगिरी केली. त्यानं पहिल्या हाफमध्ये संघासाठी सहा पॉईंट प्राप्त केले. मोहित गोयतच्या खात्यातही चार गुण जमा झाले.
दुसऱ्या हाफमध्ये पुणेरी पलटनचा उत्कृष्ट खेळ
दुसऱ्या हाफमध्ये जयपूरच्या संघानं पुनरागमन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण पुणेरी पलटनच्या डिफेंडर्सनं त्यांना संधी दिली नाही. अस्लमनं रेडमध्ये आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि सुपर 10 पूर्ण केला. दुसऱ्या हाफमध्ये अर्जुननं पुनरागमन करत पहिल्या हाफपेक्षा चांगला खेळ दाखवला. जयपूरच्या डिफेंडर्सनं वारंवार चुका केल्या आणि त्याचा फायदा पुणेरी पलटनला मिळाला.
हे देखील वाचा-