T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाने मंगळवारी पर्थ स्टेडियमवर (Perth Stadium) खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा (AUS vs SL) सात विकेट्स राखून पराभव केलाय. ऑस्ट्रेलियाच्या विजयात मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) सिंहाचा वाटा उचलला. मार्कस स्टॉयनिसनं अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक ठोकून ऑस्ट्रेलियाच्या संघाला टी-20 विश्वचषकतील पहिला विजय मिळवून दिला. या धमाकेदारी खेळीसह मार्कस स्टॉयनिसच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झालीय. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनंतर (Yuvraj Singh) टी-20 विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतकं ठोकणारा मार्कस स्टॉयनिस पहिला खेळाडू ठरला. 


ट्वीट-






 


टी-20 विशचषकातील दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक
टी-20 विश्वचषकातील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. या यादीत भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज युवराज सिंह अजूनही टॉपवर आहे. त्यानं 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. 


टी-20 क्रिकेटमध्ये जलद अर्धशतक करणारा तिसरा खेळाडू
ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद अर्धशतक करणारा मार्कस स्टॉयनिस तिसरा खेळाडू ठरला. तसेच श्रीलंकेविरुद्ध झंझावाती अर्धशतकासह त्यानं डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनाही मागं टाकलंय, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 18 चेंडूत 50 धावांचा टप्पा ओलांडला होता. 


ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर सात विकेट्स राखून विजय
या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं निर्धारित 20 षटकात 157 धावांवर रोखलं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघानं सात विकेट्स राखून हे लक्ष्य पूर्ण केलं. या सामन्यात मार्कस स्टॉयनिसनं तुफानी अर्धशतक ठोकलं. याशिवाय, ग्लेन मॅक्सवेलनंही 12 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 23 धावांची खेळी केली. कर्णधार आरोन फिंचनं 31 चेंडूत 42 आणि मिचेल मार्शनं 17 धावांचं योगदान दिलं. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरला 11 धावांची खेळी करता आली. 


हे देखील वाचा-