एक्स्प्लोर

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची फाईव्ह स्टार कामगिरी

पट्टाया (थायलंड) : आठव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय शरीरसौष्ठवपटूंनी फाइव्हस्टार कामगिरी करीत एका सुवर्णासह पाच पदके पटकावण्याची किमया साधली. भारताला ज्यूनियर गटात 75 किलो वजनी गटात इफाम मोहम्मद वश्मीर खान या 19 वर्षीय युवकाने स्वप्नवत सुवर्ण जिंकून दिले. भारताने दमदार कामगिरी केली असली तरी पहिला दिवस गाजवला तो थायलंडच्या खेळाडूंनी. यजमानांनी चोहोबाजूंनी पदकांचा सपाटा लावत सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि 3 कांस्य अशी 15 पदके जिंकून संस्मरणीय यश संपादन केले किमान 15 पदकांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पट्टायाला उतरलेल्या भारताच्या जंबो संघाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळवले. दिवसाच्या प्रारंभीच एम.राममूर्ती, एस. भास्करन, राहुल सिंधा या खेळाडूंनी 55, 60 आणि 65 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठून जबरदस्त सुरूवात करून दिली. राममूर्तीने भारताला पहिले पदक जिंकून दिले. मात्र त्याचे पदक सोनेरी होऊ शकले नाही. जबरदस्त तयारीत असलेल्या भास्करनकडून पदकाची अपेक्षा होती, पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर राहुल सिंधाने कांस्य जिंकून भारताला दुसरे यश संपादून दिले. भारतीय महिला जोरात महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत रबिता देवी आणि ममता देवीला अंतिम फेरी गाठता आली नाही. 55 किलो वजनी गटात सरिता देवीने अंतिम फेरी गाठली खरी पण तगड्या प्रतिस्पर्ध्यांपुढे ती खुजी वाटली आणि तिला चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले. मात्र फिजीक फिटनेस प्रकारात सोनिया मित्रा आणि श्रेयशी दास चौधरी यांनी पदके जिंकून भारताच्या पदकांची संख्या चार वर नेली. 40 ते 49 वर्षे वयाच्या गटात मंदार चवरकर अपयशी ठरला. मात्र पीटर जोसेफने अंतिम फेरी स्थान मिळवले. तोसुद्धा पदक मिळविण्यात कमी पडला. जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची फाईव्ह स्टार कामगिरी थायलंडचे सांघिक विजेतेपद निश्चित पहिल्याच दिवशी 15 पदके जिंकणाऱया थायलंडने आपले सांघिक विजेतेपदही जवळजवळ निश्चित केले आहे. थायलंडला पुरूषांच्या 65 किलो वजनी गटात, महिलांच्या फिटनेस फिजीकमध्ये दोन, वरिष्ठांच्या शरीरसौष्ठवाचे एक ,ज्यूनियर गटाचे एक आणि फिजीक फिटनेसचे एक असे सहा सुवर्ण जिंकून अनोखा षटकार ठोकला. जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा निकाल : 55 किलो वजनी गट (पुरूष )- 1. कान खुआँग (विएतनाम), 2. एम. रामामूर्ती (भारत), 3. शाओ ली झू (चीन), 4. मुजाहिद हुसेन (पाकिस्तान), 5. चैपिपात लिवत्राकुल (थायलंड). 60 किलो - 1. नुयेन आन्ह थाँग (विएतनाम), 2. जिराफन पौंगकाम (थायलंड), 3. मालवर्न अब्दुल्ला (मलेशिया), 4. एस. भास्करन (भारत), 5. तुन तुन आँग (म्यानमार). 65 किलो - 1. सोमखित सुमेथोवेचाकुन (थायलंड), 2. सुरासक पानरूआंग (थायलंड), 3. राहुल सिंधा ( भारत ), 4. अब्दुल रानी (मलेशिया), 5. झांग झियो यान (चीन). महिला फिटनेस फिजीक (160 से.मी.पर्यंत)-1. नाँगयाओ कोसीनाम (थायलंड), 2. सोनिया मित्रा (भारत), 3. सिरीपॉर्न सोर्नचॉय (थायलंड). महिला फिटनेस फिजीक (165 से.मी.पर्यंत)-1. सोफिया क्रासाकोविक्स (हंगेरी), 2. अजारी तनसुब (थायलंड), 3. बॅचीमेग बडामसुरेन (मंगोलिया). महिला फिटनेस फिजीक (165 से.मी.वरील)- 1. रूंगतवान जिंदासिंग (थायलंड), 2. फोंडचनोक प्लुमजित (थायलंड), 3. श्रेयशी दास चौधरी (भारत). ज्यूनियर शरीरसौष्ठव (75 किलो)- 1. इफाम मोहम्मद वश्मीर खान (भारत), 2. न्यामसुरेन चिनझोरिग ( मंगोलिया), 3. नाथाफाँग येनगुलीयाम (थायलंड). ज्यूनियर शरीरसौष्ठव (75 किलोवरील)- 1. अफिचाल वांडी (थायलंड), 2. हमीद घोफरानी (इराण), 3. मोहम्मदहदी यझदानी (इराण)

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 1st ODI : वेस्ट इंडिजचा पार 'कचरा' केला! गिल-कोहलीचं वादळी शतक अन् कुलदीपचा असा डंका की कॅरिबियन बेटे पुरती हादरली, टीम इंडियाचा मोठा विजय
वेस्ट इंडिजचा पार 'कचरा' केला! गिल-कोहलीचं वादळी शतक अन् कुलदीपचा असा डंका की कॅरिबियन बेटे पुरती हादरली, टीम इंडियाचा मोठा विजय
IND vs WI 1st ODI Update : तिरुअनंतपुरममध्ये टीम इंडियाचा धुमाकूळ! वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून धुव्वा, मालिकेत 1-0 अशी आघाडी
तिरुअनंतपुरममध्ये टीम इंडियाचा धुमाकूळ! वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून धुव्वा, मालिकेत 1-0 अशी आघाडी
Virat Kohli Century IND vs WI 1st ODI : 'किंग' इज बॅक! तोच रूबाब, तोच थाट; विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले वादळी शतक, क्रिकेटच्या देवाला टाकले मागे
'किंग' इज बॅक! तोच रूबाब, तोच थाट; विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले वादळी शतक, क्रिकेटच्या देवाला टाकले मागे
SA vs AUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेंबा बावुमा गरजला! ठोकले वादळी शतक अन् थेट MS धोनीची बरोबरी, विराट कोहलीचा विक्रम धोक्यात
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेंबा बावुमा गरजला! ठोकले वादळी शतक अन् थेट MS धोनीची बरोबरी, विराट कोहलीचा विक्रम धोक्यात

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
Embed widget