एक्स्प्लोर

तब्बल 8 वर्षांनी पार्थिव पटेल भारतीय संघात !

मुंबई:  तब्बल आठ वर्षांपूर्वी शेवटची कसोटी आणि चार वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या विकेटकीपर पार्थिव पटेलचं नशिब चमकलं आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पार्थिव पटेलचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. रिद्धीमान साहाला दुखापत झाल्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी कालच भारतीय संघाची घोषणा झाली. भारताच्या सोळा सदस्यीय संघातून सलामीवीर गौतम गंभीरला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्याऐवजी संघात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा समावेश करण्यात आला आहे. रिद्धीमान साहाला दुखापत हा निर्णय झाल्यानंतर बीसीसीआयने तब्बल 15 तासांनी पार्थिव पटेलचाही टीम इंडियात समावेश झाल्याची घोषणा केली. रिद्धीमान साहाच्या मांडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी पार्थिव पटेल मैदानात उतरणार आहे. पार्थिव पटेलने 2002 मध्ये पहिली कसोटी खेळली होती. त्यावेळी त्याचं वय 17 वर्ष 153 दिवस होतं. त्यामुळे तो कसोटी खेळणारा सर्वात तरुण विकेटकीपर ठरला होता. मात्र आता कोहलीच्या नेतृत्त्वातील टीम इंडियातील तो दुसऱ्या क्रमांकाचा वयस्कर क्रिकेटपटू असेल. सध्या त्याने 31 वर्ष पूर्ण केली आहेत. पार्थिव पटेलसमोर 19 वर्षीय रिषभ पंतचं मोठं आव्हान होतं. रिषभने नुकतंच रणजी चषकात त्रिशतक झळकावलं होतं. इतकंच नाही तर रणजी सामन्यातील जलद शतकाची नोंदही त्याच्याच नावावर आहे. रिषभने 48 चेंडूत शतक ठोकलं होतं. पंतशिवाय मध्यप्रदेशचा रणजीपटू नमन ओझाही या शर्यतीत होता. मात्र दुखापतीमुळे त्याचंही नाव मागे पडलं.   तसंच तामीळनाडूचा दिनेश कार्तिक हा पर्यायही निवड समितीसमोर होता. मात्र पार्थिव पटेलने या सर्वांना मागे टाकत टीम इंडियात पुनरागमन केलं. संबंधित बातम्या गंभीरला भारताच्या कसोटी संघातून डच्चू, भुवीचा समावेश कसोटी कर्णधार विराट कोहलीवर मोठा आरोप कोहलीची लांब उडी, रँकिंगमध्ये 14 वरुन चौथ्या स्थानी तिसऱ्या कसोटीतून ब्रॉड आऊट, इंग्लंडला मोठा धक्का जयंतनं कानमंत्र दिला अन् शमी चमकला!

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
Rohit Sharma Retirement: गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Embed widget